भिवापूर :- दि. ०५/०९/२०२४ रोजी अंदाजे सकाळी ११/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे मधुकर दशरथ घोडमारे वय ५० वर्ष रा. तास ता. भिवापुर जि. नागपुर हे तास बस स्टँडवरवर हजर असता तेथे आयसर ट्रक वाहन क्र. MH 31/AP-2966 हे राशनचे तांदळाचे बोरे भरुन भिवापुर वरुन तास बस स्टॅन्ड येथे येवुन उजव्या साईडचा वळनावरून तास गावामध्ये येत असताना त्याचवेळी नागपुर उमरेड रोडवरुन भिवापुरकडे येणारी ट्रॅव्हल्स वाहन क्र. MH 49]-8616 व ट्रक क्र. MH 31/AP-2966 याला जोरदार धड़क झाली. सदर ट्रक हा पलठुन बस स्टैंड वरील कैलास शेन्डे यांची पानटपरीला धडक दिल्याने ट्रक यांची समोरची कॅबिन तुटफुट होवुन डाल्यातील तांदळाचे बोरे हे खाली पडले. यातील ट्रॅव्हल्स वाहन रोडलगतच्या निंबाच्या झाडाजवळ पलटी झाली. यातील फिर्यादी व गावातील लोकांनी ट्रॅव्हल्स जवळ जावुन जखमींना बाहेर काढले. सदर पटनेमध्ये ट्रॅकल्सच्या कॅविन खाली १) मृतक नामे नैतिक जितेंद्र मडावी वय १४ वर्ष रा. कन्हाडगाव ता. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर हा दवल्याने त्याचा मृत्यु झाला व ट्रॅव्हल्स मधील प्रवासी हे गंभीर जखमी होवुन यामध्ये मृतक नामे २) जसवंत वसंतराव बावनकर वय ५५ वर्ष रां उमरेड, ३) संजय वेगेश्वर सोणकुसरे वय ४८ वर्ष, रा. शांतीनगर नागपूर ४) सुरेखा अंकुश ठवरे वय ४२ वर्ष रा. नाड शिवणफड ता भिवापूर मृत पावले. तसेच ट्रॅव्हल्स मधील इतर २३ प्रवासी जखमी झाले. ते पुढीलप्रमाणे- १) वंदना देवचंद नैताम वय २३ वर्ष रा. चिक मांग सींदेवाही २) प्रिया नंदलाल पटेल, वय २१ वर्ष रा. सिंदेवाही ३) आरुषी अभय गाजपटे, १७ वर्ष रा. नागपूर ४) अनुराग महादेव सलोरे वय २२ वर्ष ५) रवी मोतीराम वाघमारे वय ४५ वर्ष रा. धरमापुर, भिवापूर ६) पोर्णिमा भुरवास निकुरे वय २५ वर्ष रा. आवडगाव नागभीड ७) प्रमोद मारुती शिंगेवार वय ५३ वर्ष रा. शिदिवाही ८) सुदाम उडूजी मेश्राम वय ६८ वर्ष, रा. शिंदेवाही ९) शालिक अर्जुन कुंभरे वय ३५ वर्ष रा. चंद्रपूर १०) समीक्षा वसंता धारणे वय १७ वर्ष रा. भिवापूर ११) अल्केश श्यामसुंदर तिवाडे ४५ वर्ष राहणार उमरेड १२) मारुती जूनोजी लांजेवार वय ६० वर्ष राहणार नागपूर १३) प्रणित दिवाकर दिल्वार वय ३७ वर्ष राहणार नागपूर १४) शोभा रामकृष्ण गजभिये साठ वर्ष राहणार नागभीड १५) राजू राजेंद्र धूल वय ४९ वर्षे राहणार नागपूर १६) नख्या अभय गजघाटे वय १५ वर्षे राहणार नागपूर १७) किशोर मला शालिक कुंबरे शालिक कुमरे राहणार पाथरी जिल्हा चंद्रपूर १८) आदित्य शालीक कुभरे वय ०७ वर्ष राहणार पाथरी चंद्रपूर १९) आदर्श शालिक कुंभरे वय ५ वर्ष राहणार पाथरी जिल्हा चंद्रपूर २०) जिजाबाई मोहन मडावी वय ६० वर्ष राहणार शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर २१) सोनू संजय बोरकर वय ३३ वर्ष राहणार कापसी नागपूर २२) आम्रपाली नथुजी गेडाम वय ३६ वर्ष राहणार शिवापूर तहसील भिवापूर २३) लता शामराव गणवीर वय ४५ वर्ष राहणार शिवापूर तालुका भिवापूर यांना पुढील वैद्यकीय उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय भिवापूर तसेच मेडीकल कॉलेज नागपूर येथे भर्ती केले आहे. सदर अपघातासंबंधी पोस्टे भिवापूर येथे कलम १०६, १२५ (अ), १२५(व), २८१ वी.एन.एस सहकलम १८४ मोवाका. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळावर फॉरेन्सिक टिम ला बोलावण्यात आले असुन फॉरेन्सिक टिमने सदर अपघाताबाबत रीपोर्ट दिल्यावर कोणत्या वाहनचालकाची चुक आहे हे ठरविले जाईल. गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल हे करीत आहे.
सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड राजा पवार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पोस्टे भिवापूर ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी भेट दिली. सदर घटनेसंबंधी नागपूर ग्रामीण पोलीसाकडुन प्रादेशिक परीवहन कार्यालय नागपूर यांचेकडे अपघातामधील ट्रॅकल्स वाहन क्र. MH 49]-8616 याबाबत फिटनेस सर्टीफिकेट व परमिट व्हॅलिड बाबत माहिती मागवली असता प्रादेशिक परीवहन कार्यालय नागपूर यांचेकडुन सदर ट्रॅव्हल्सचे फिटनेस सर्टीफिकेट व परमिट हे व्हॅलिड असल्याचे सांगितले.