भिलगाव गावांतर्गत सर्वत्र ठिकाणी जंतूनाशक फॉगिंग फवारणी करण्याबाबत व भिलगाव मधे होत असलेल्या दूषित पानी पुरवठा बाबत निवेदन सादर
कामठी ता प्र 21 :- गेल्या १५ – २० दिवसांपासून सर्वत्र दमदार पाऊस पडलेला आहे. त्यामुळे भिलगाव येथील सखल भागात सर्वत्र पाणी साचलेले आहे. पाणी निच-याची कुठलीही सुविधा कायमस्वरूपी नसल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुषित पाण्याचे डबके साचलेले असल्याने यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे डेंग्यू, विषमज्वर व इतर तत्सम आजाराचा फैलाव होण्याची भीती आहे.
भिलगाव येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दुष्टीने दूषित पानी पुरवठा तत्काळ थाम्बविन्यत यावा व जंतूनाशक फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे, तरी ग्रामपंचायत मार्फत तत्काळ फवारणी सुरु करण्यात यावी असे निवेदन देन्यात आले .यावेळी माज़ी उपसरपंच भिलगाव ग्रापं चंद्रकात फलके, भिलगाव काँग्रेस अध्यक्ष खिमेश बढिये, सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके , काँग्रेस पदाधिकारी मनोहर चौधरी , अफ़सर खान , रूपेश मानकर , अनिकेत शेलके, शामकुमार लोनारे ,अमोल सेलोकर , इमरान खान , दीपक लेंडे व इतर उपस्थित होते.