नागपूर :-अटल इनोव्हेशन मिशनव्दारे घेतल्या गेलेल्या एटीएल मॅरेथॉन स्पर्धेत भिडे हायस्कूल ऍंड ज्युनिअर काॅलेजच्या”स्मार्ट ऍग्रीकल्चर” या उपक्रमाची प्राधान्याने निवड करण्यात आली.
संपूर्ण देशातून याकरिता एक लाखाहून अधिक उपक्रम सादर करण्यात आले होते. त्यातून तज्ज्ञांनी १५०० विशेष उपक्रम निवडले. या निवडक उपक्रमात भिडे हायस्कूलने वर्णी लावली; हे विशेष.
शाळेने विविध सेंसर्स; मायक्रोकंर्टोलर व्दारे स्मार्ट ऍग्रीकल्चर हा प्रकल्प सादर केला. या उपक्रमाकरिता वर्ग ८ च्या अमन सिंग; कुणाल बन्सोड व आर्यन चावके या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. एटीएलचे विभागीय मार्गदर्शक अरविंद लोंढे; भिडे गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष सागर कुळकर्णी; सदस्य श्रध्दा तेलंग; मुख्याध्यापिका अर्चना गढीकर; पर्यवेक्षिका नीता कुकडे; एटील प्रमुख वसुधा अंभईकर; आकांक्षा वर्मा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.