नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये ६५ वर्षावरील वयोगटात भाविका रामटेके यांनी दुहेरी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली.
६५ वर्षावरील महिलांच्या महिलांच्या १०० मीटर दौडमध्ये नागपूर येथील भाविका रामटेके(२०.१६) सुवर्ण पदकाची कमाई केली. ६५ वर्षावरील महिलांच्या लांब उडीमध्ये देखील नागपूर येथील भाविका रामटेके यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. या स्पर्धेत अमरावतीच्या नंदा सोनूने यांनी रौप्य तर नागपुरातील सुनंदा गाहोड यांनी कांस्य पदक पटकाविले.
महिलांच्या १०० मीटर दौडमध्ये ७० वर्षावरील वयोगटात नागपूर येथील सीमा पवार (२३.०९) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. तर नागपूर येथील शशीकला माने (२२.३४) यांनी रौप्य पदक प्राप्त केले. पुरुषांच्या १०० मीटर दौडमध्ये ७५ वर्षावरील वयोगटात यवतमाळच्या तुलसीराम खामनकर (२३.०२) यांनी सुवर्ण व नागपूर यैथील इकबाल अंसारी (२४.०१) यांनी रौप्य पदक पटकाविले. ७० वर्षावरील वयोगटात रियाझ अहमद (१५.१०), कुंवर डोंगरे (२१.०१) आणि रामदास सेलोकर (२२.३१) या नागपूरकर खेळाडूंनी अनुक्रमे सुवर्ण रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली.
८० वर्षावरील पुरुषांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेत नागपूर येथील श्रीपथ भुरडे (१०.२८) यांनी सुवर्ण पदक, ७५ वर्षावरील पुरुषांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेत बुलढाणा येथील मोहनसिंग तोमर (७.५०) यांनी तसेच ७० वर्षावरील पुरुषांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेत चंद्रपूर येथील मारोती दरकुडे (१२.३५) यांनी सुवर्ण पदक पटकाविले.
अन्य निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)
५००० मीटर चालणे
६५ वर्षावरील पुरुष
रणराज वर्मा, दामोधर वानखेडे, धनेश्वर शिरपुरकर.
६० वर्षावरील पुरुष
डॉ. सुरेश शर्मा, चंद्रशेखर मस्के, पांडुरंग भिवगडे
१५०० मीटर दौड
४० वर्षावरील पुरुष
गौतम कोकाटे अमरावती (७.३६).
४५ वर्षावरील पुरुष
दत्तकुकार सोनवाले नागपूर (५.४०), योगेश जयस्वाल नागपूर (५.४१,) रुपेश चोपडे वर्धा (५.५२,)
५५ वर्षावरील पुरुष
राजेश पाटील नागपूर (७.२१), सतीश मुडे यवतमाळ (६.२३)
६० वर्षावरील पुरुष
राज डोंगरे अमरावती (७.०८)
७० वर्षावरील पुरुष
दत्तकुकार सोनवाले नागपूर (५.४०), योगेश जयस्वाल नागपूर (५.४१,) रुपेश चोपडे वर्धा (५.५२,)
४५ वर्षावरील महिला
रेणू सिद्धु नागपूर (७.१७)
२०० मीटर दौड
४० वर्षावरील महिला
मोना माटे नागपूर (४४.८०), मनीषा मोरले नागपूर (५२.६५,) लता अहिरकर नागपूर (५४.३५,)
५० वर्षावरील महिला
रत्ना गानोरकर नागपूर (१.१८.००), गायत्री घाटबांधे नागपूर (१.०६.००)
६५ वर्षावरील महिला
शोभा खडसे यवतमाळ (१.०६.००)
१०० मीटर दौड
४० वर्षावरील महिला
बिनीता कुमार नागपूर (१६.०२), वर्षा रामटेके नागपूर (२०.२१) लता अहिरकर नागपूर (२२.४०)
४५ वर्षावरील महिला
ज्योती पटेल यवतमाळ (२७.३५)
५० वर्षावरील महिला
वनमाला कापसे नागपूर (१७.९५), प्रतिभा वाघमारे नागपूर (२८.३८) रत्ना गानोरकर नागपूर (२८.९५)
५५ वर्षावरील महिला
रीता मेहता नागपूर (२०.४६), जयश्री गायधने अमरावती (२५.१०)
६० वर्षावरील महिला
इंदिरा भोयर नागपूर (२१.२२), सुलेखा नागपूर (३२.३४) राजकुमारी इश्रानी यवतमाळ (४६.४०)