संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ
कामठी :- भारत सरकारच्या फ्लॅग शिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसीत भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी तालुक्यातील बिडगाव- तरोडी-पांढुर्णा नगरपंचायत चे प्रशासक संदीप बोरकर यांनी बिडगाव नगर पंचायत परिसरात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात व्यक्त केले.तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र अद्याप ज्यांना लाभ मिळू न शकलेल्या पात्रता धारक वयी व्यक्तीपर्यंत केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनांचा लाभ पोहोचावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केले असल्याचे मत प्रशासकीय अधिकारी आबासाहेब मुडे यांनी व्यक्त केले.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत देण्यात आली.यात्रे दरम्यान लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच .सदर मोहीम अंतर्गत केंद्र शासनाच्य विविध योजना,प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना, बँकांमार्फत विविध कर्ज योजना,आधार अपडेट,आरोग्य शिबीरचा लाभ देण्यात आला.यावेळी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी यात्रेचे स्वागत प्रशासक संदीप बोरकर ,नगरपंचायत पदाधिकारी व नागरीकांच्या वतीने करण्यात आले.याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी आबासाहेब मुडे, गौरव देवतरे अवी चौधरी, वीरेंद्र धोके छगन ठवकर, विशाल पाचदरे ,शिशिर पाटील ,प्रदीप तांबे, विशाल गजभिये ,लोकप्रतिनिधी,लाभार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .