भंडारा, दि. 23 : सन 2021-22 या कालावधीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांनी 31 मे, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक, बोनाफाईड सर्टिफिकेट, बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी जिथे राहतो त्याबाबत पुरावा ( खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र यासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन जिल्हा परिषद चौक, भंडारा या कार्यालयात 31 मे, 2022 पर्यंत सादर करावे, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.