भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

-माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अन्य.

नागपूर. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजयपेयी यांच्या प्रतिमेला ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून वंदन केले.

यावेळी ज्ञानेश्वरजी धोपटे, शैलेश बोरकर, अजय गोंधळेकर, रोशन बारमासे, शेखर जुनघरे, विक्रम डूंभरे, अनिकेत धोपटे, प्रित ढोले, राम सामंत, भारतीय क्रीडा प्राधिकरणचे अभियंता शरद देशमुख, छत्रपती पुरस्कार विजेते आशिष बॅनर्जी आदी उपस्थित होते.

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवनात लोकशाही आणि मानवी मूल्यांचा सन्मान केला. देशात सरकार कुणाचे सरकार असो मात्र लोकशाही सदैव अमर असावी, हे त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे. देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रोत्साहन दिले. देशाच्या पायाभरणीत, विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी याप्रसंगी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

"Sumit Arora getting rave reviews for his role in Hari Mirch Lal Mirch "

Sat Dec 25 , 2021
Sumit Arora is born and brought up in Delhi and then shifted to Kota, Rajasthan. Some of his best works includes Akbar Birbal, Hum Paanch Fir Se, Pavitra Rishta, Tarak Mehta ka Ooltah Chashma and Saavdhan India amongst others. Dablyu is Pushpy’s elder son. He is a gentleman and he has a daily routine of going to the shop in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com