संदीप कांबळे,कामठी
-नगरसेवक काशिनाथ प्रधान यांच्या पुढाकाराने कामठी नगर परिषद च्या 17 लक्ष रुपयांच्या मंजूर निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण
कामठी ता प्र 28:-कामठी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या शुक्रवारी बाजार परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या जिर्ण झालेल्या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती संस्था शुक्रवारी बाजार कामठी च्या पदाधिकारी च्या वतीने प्रभाग क्र 10 चे नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्याकडे केलेल्या मागणीला अनुसरून नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी सदर मागणीला गांभीर्याने घेत कामठी नगर परिषद च्या सभेत विषय मंजूर करून घेत पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 17 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. व या मंजूर निधीतून नगर परिषद च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले.व परिसर नाविन्य निर्माण केले.या परिसरात १९३०पासुन अनेकदा परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मार्गदर्शन पर उपस्थिती राहिली त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक शुक्रवार बाजार कामठी येथील परिसराचे सौंदर्यीकरण व १९८५साली जगन्नाथ मेश्राम यांनी दान दिलेला व रिपब्लिकन चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक रा सु गवई याच्या हस्ते उदघाटीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम भन्ते नागदीपंकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमा च्या निमित्त परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दिंक्षाभुमी चे विश्वस्त भदंत नाग दिपंकर स्थविर यानी जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांचे काळापासुन आॅल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, समता सैनिक दल, स्वतंत्र मजुर पक्ष ,शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,दि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया च्या ऐतिहासिक सभा संम्मेलन आंदोलन व विचारधारेचे अविस्मरणीय प्रेरणास्थळ असलेल्या उपरोक्त चौकाचा ईतीहास विषद करताना कर्मविर अॅड दादासाहेब कुंभारे यांच्या मार्गदर्शनात बिडी कामगार आंदोलना चे प्रेरणास्थळ असलेल्या उपरोक्त चौकाचा ईतीहास आज खऱ्या अर्थाने वर्तमानातील सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समीतीने नाविण्य प्रदान करण्या करीता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केला तेव्हा ते गौरवास पात्र आहेत या वाटचालीत अनेकानेक लोक मृत्यु मुखी पडलेत .अनेकानेक लोक हयात आहेत .प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला त्या सर्वाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत परन्तु या पुढे या परिसरातील सौंदर्यीकरण टिकुन राहिल येथुन विविध उपक्रमांच्या माध्यमातुन सदोदित लोककल्यानाभीमुख वाटचाल वृद्धि गत व्हावी हिच मनपुर्वक सदिच्छा पर लाख-लाख बधाई अभिनंदन मंगल कामना व्यक्त केली .उपरोक्त कार्यक्रमा च्या निमित्त विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्व उपस्थित होते.ज्यामध्ये प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती संस्था शुक्रवारी बाजार कामठी चे सल्लागार गेडाम, सहसचिव शीतल फुलझेले, सचिव अजय भालेकर, संचालक अनिल पाटील, प्रकाश लाईनपांडे, एस एस सहारे, विजय पाटिल ,उमाकांत चिमनकर, नामदेव पख्खीड्डे, प्रमोद टेंभुर्णे ,शुद्धोधन पाटिल ,तसेच महिला पदाधिकारी अर्चना भीमटे,शिलाताई मेश्राम,सुधा रंगारी,विद्याताई भीमटे,विशाखा गजभिये, पिंकी थोरात, सोनाली भालेकर, रेखा पाटील, प्रतिभा बेलेकर, माधुरी उईके, नंदा डोंगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम चे संचालन अर्चना सोमकुवर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्या करीता भारतीय बौद्ध महासभा, सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समीती, कामठी महिला संघ यांनी प्रयत्न केला .याप्रसंगी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थीत होते.