सोमवारी जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटिव्ह

  • रुग्ण डिस्चार्ज00
  • एकूण डिस्चार्ज58969
  • एकूण पॉझिटिव्ह60105
  • क्रियाशील रुग्ण03
  • आज मृत्यूशून्य
  • एकूण मृत्यू1133
  • रिकव्हरी रेट98.11 टक्के
  • मृत्यू दर01.89
  • आजच्या टेस्ट13
  • एकूण टेस्ट473406

भंडारा, दि. 22 : जिल्ह्यात सोमवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.22) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. सोमवारी 13 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता तीन सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60105 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 73 हजार 406 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60105 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत,त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविडवर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कामठी महामार्ग बंद, पुलावर वाहतूक ठप्प -वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची गरज -तीन महिणे असेल वाहनांची गर्दी

Tue Nov 23 , 2021
नागपूर– उत्तर नागपूरला जोडणारा कामठी महामार्ग पुढील तीन महिण्यासाठी बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून संपूर्ण वाहतूक मंगळवारी बाजार पुलावरून वळविण्यात आल्याने पुलावर तासभर वाहतूक ठप्प होती. वाहतूक पूर्णत विस्कळीत झाल्याने कार्यालयात जाणाèयांना उशिर झाला.  वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या गर्दीत अनेकांचे वाहन फसले. विशेष म्हणजे प्रचंड गर्दी होवूनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com