संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जीवनात जो भक्ती करत नसेल त्याचे जीवन व्यर्थ आहे त्यासाठी सर्व सुख जरी असेल तरी त्याला भक्ती मार्गाची जोड लावणे आवश्यक आहे तरच जीवन सार्थकी लागेल.भक्ती करत असताना सुद्धा भरकटत जाऊ नका.भक्ती केल्याने कुटुंबात आनंद व सुसंस्कृत पिढी निर्माण होते म्हणूनच प्रत्येकाने जीवनात कथावाचन करणे गरजेचे आहे असे मत कथा व्यास पंडित आशिष कुमार शर्मा यांनी शितलप्रसाद पटेल व समस्त पटेल कुटुंबियांच्या वतीने यादव नगर येथे आयोजित श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमात व्यक्त केले.
या शिवमहापुरान कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार 6 जानेवारीला करण्यात आला असून 14 जानेवारीला समापन होणार आहे. हे शिवमहापुरान कथा श्रवण करण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थितिती दर्शवित आहेत. तर अनेक भाविक गण आता आध्यत्मिक मार्गाकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे तसेच यादव नगर परिसरात भक्तिमय वातावरण पसरला असून हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमत आहे.