नागपूर :- पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी काही कारणानी दूषित झाल्यास डायरिया/गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, टायफॉईड, हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. तसेच उघडयावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून, ते दूषित झाल्यास उलटया, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. सर्वसाधारण पणे पावसाळयामध्ये अशा आजाराचे प्रमाण वाढते. म्हणून नागरिकांनी याबाबत खबरदारी बाळगत दूषित पाणी व अन्न पदार्थांपासून उद्भवणाऱ्या आजारांपासून काळजी घ्यावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.
मनपाचे नोडल वैद्यकिय अधिकारी(साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले की, यावर्षी जानेवारी 2024 पासून जलजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. यात जानेवारीपासून आजवर डायरिया/गॅस्ट्रोच्या एकूण ५८७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, विषमज्वरचे ९० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय कावीळचे १४ रुग्ण आढळे आहेत. मनपा साथरोग प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना अर्तगंत सर्व जलजन्य आजारी रुग्णाची माहिती प्राप्त होताच रुग्णाच्या निवासी परिसरात भेट देऊन गृहभेटी, सर्वेक्षण, जनजागृती व पाणी नमुने तपासणी करण्यात येते. या सोबतच गृहभेटीव्दारे रुग्णाचा शोध घेउन त्यांना उपचार व मार्गदर्शन करण्यात येते. या प्रकारे जलजन्य आजाराचा उद्रेक प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येते.
जलजन्य आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी मनपा नळावाटे पुरवठा होणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोरवेल शुध्दीकरण न केलेल्या विहीरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये. शिळे किंवा उघडयावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाऊ नये तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. हातगाडयावर उघडयावर विकले जाणारे खादय पदार्थ खाऊ नये. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून थंड करुन प्यावे, पिण्याचे पाणी दूषित आढळल्यास त्यामध्ये क्लोरीन गोळयांचा वापर करावा व एक क्लोरीनची गोळी 20 लिटर पाण्यामध्ये चुरा करुन टाकावी. पावसाळयात खादय पदार्थ उघडे न ठेवता झाकून ठेवावे, भांडी स्वच्छ ठेवावी, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा.
भेलपुरी, पाणीपुरी वाल्यानी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, क्लोरीनच्या गोळीचा वापर करावा व हॅन्ड ग्लोज चा वापर करावा. प्रत्येक नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करावे. उलटया, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाइड झाल्यास त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरु करावेत. सर्व मनपा व शासकिय दवाखान्यामध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात गॅस्ट्रो रुग्णांवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे. ताप, मळमळ, चक्कर, उल्टी, हगवन, इत्यादी गॅस्टोची लक्षणे असून रुग्णाला त्वरित ओ.आर.एस. पाजावे व त्वरित डॉक्टरांकडे जाउन उपचार करुन घ्यावा.
सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या अशा रफग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागास त्वरित द्यावी, नागरीकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. नागरीकांनी वरिल सुचनाचे पालन केल्यास पावसाळयात उदभवणा-या आजारावर नियंऋाण ठेवण्यास मदत होईल. त्याकरिता नागरिकांना मनपाला सहकार्य करावे.