खबरदार! नॉयलॉन मांजाची विक्री, हाताळणी केल्यास होणार कारवाई

– नॉयलॉन मांजाच्या तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी

नागपूर :- नॉयलॉन मांजाच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून प्रतिबंधित नॉयलॉन मांजा किंवा या नावाने परिचित अशा पक्क्या धाग्यांचा वापर, विक्री, हाताळणी आणि साठवणूक करताना आढळल्यास मनपाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल जनहित याचिका मधील प्राप्त आदेशान्वये तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण (संरक्षण) कायद्यानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

मकरसंक्रात सणाच्या अनुषंगाने पतंग उडविण्यासाठी कृत्रिमरीत्या, प्लास्टिकपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाचे परिचित असलेल्या पक्क्या धाग्यांचा वापर केला जातो. मात्र हा मांजा, धागा मानवासह पक्षी व इतर सजीवांकरिता धोकादायक आहे. या मांजामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व मांजा विक्रेत्यांनी कृत्रिमरित्या प्लास्टिकपासून बनवलेल्या नायलॉन मांजाचा, पक्क्या धाग्याचा वापर करू नये, असे आवाहन उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे. नायलॉन मांजाचा वापर, विक्री, हाताळणी, साठवणुक करताना आढळून आल्यास संबंधितांवर नियमान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.

डॉ. महल्ले यांनी नागपूर शहरातील नागरिकांना मांजाचा वापर न करण्याचे आवाहन करतानाच नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास मनपाला माहिती देण्याचे देखील आवाहन केले आहे. नागरिकांनी नॉयलॉन मांजाची विक्री करणा-यांची माहिती मनपाच्या ८६००००४७४६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तसेच नागपूर महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक, इंस्टाग्रामवरील @nmcngp या पेजवर आणि एक्स (ट्विटर)च्या @ngpnmc या पेजवर टॅग करून माहिती द्यावी, असेही आवाहन डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण

Sat Jan 6 , 2024
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या 2,395 घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ बारा दिवसात पूर्ण केले. महावितरणच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात आदीम जमातींची 2,454घरे नव वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत उजळण्यात यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com