३१ मे रोजी लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साधणार संवाद

31 मे रोजी सिमला येथे राष्ट्रीय परीसंवाद
नवी दिल्ली येथून प्रधानमंत्री तर मुंबईतून मुख्यमंत्री संबोधित करतील
नागपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग
 बचत भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या धर्तीवर शासनाने लाभार्थ्यांस सोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री उद्घव ठाकरे तर सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
    ३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथील आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार  आहेत.
   जिल्हास्तरावर यासाठी नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्ह्यातील विविध योजनेतील लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यासोबतच केंद्र व राज्य सरकारचे मंत्री,खासदार, आमदार,महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिली.
  नागपूर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तयारी केली आहे. आज विभाग प्रमुखांची बैठक घेऊन यासंदर्भातील आढावा जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घेतला आहे.
मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनांमधील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री संवाद साधणार आहे.
    पंतप्रधानांचा परीसंवाद कार्यक्रम दोन सत्रामध्ये आयोजित केला जाईल. पहिला सत्र राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल  व सकाळी 10.50 वाजता समारोप हाईल. या प्रसंगी पीएम किसानस सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये समांतर कार्यक्रम  आयोजित करण्यात येणार आहे.
दुसरे सत्र राज्य आणि जिल्हास्तरीय शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये विविध सोशल मीडीया व्टिटर, फेसबुक, यु – ट्युब आदी चॅनेलवर हा कार्यक्रम लॉईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.
    तर राज्य शासनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी तसेच योजनाच्या यशस्वीतेसंदर्भात लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही संवाद होणार आहे. विविध जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी व लाभार्थी यामध्ये सहभागी होणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून हा सहभाग असेल,यासाठी बचत भवन येथे जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना व लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांना आमंत्रित केले आहे.नागरिकांनी या परिसंवादाचा प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा विविध माध्यमांवर ऑनलाइन उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आर.विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व ग्रामविकास विभाग या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कल लाभार्थी से संवाद करेंगे प्रधानमंत्री और मुख्यमंत्री

Mon May 30 , 2022
– 31 मई को राष्ट्रीय संगोष्ठी शिमला में,प्रधानमंत्री नई दिल्ली से और मुख्यमंत्री मुंबई से संबोधित करेंगे,सहभाग नागपुर जिले में लाभार्थियों की ऑनलाइन भागीदारी,बचात भवन में कार्यक्रमों का आयोजन   नागपुर – भारत की स्वतंत्रता की 75वीं वर्षगांठ के अवसर पर स्वतंत्रता का अमृत महोत्सव के तहत देश भर में केंद्र और राज्य सरकारों द्वारा विभिन्न पहलों को लागू किया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com