वैयक्तिक योजनांच्या लाभार्थ्यांनी झोननिहाय तलाठ्यांकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन 

– 8 ऑक्टोबरपूर्वी जमा करता येणार कागदपत्रे 

नागपूर :- विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांनी आपले मंजुरी आदेश टोकन, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाईल क्रमांक व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र तत्काळ मनपा झोननिहाय तलाठी यांचेकडे 8 ऑक्टोबरपूर्वी जमा करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

यापुढे मिळणारे अनुदान हे डीबीटी प्रणालीद्वारेच पाठविण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. यापुर्वी नागपूर महानगरपालिकेत शिबिर आयोजित करून देखील ब-याचशा लाभार्थ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत. ज्या पात्र लाभार्थ्यांनी आजवर कागदपत्रे जमा केली नाहीत त्यांनी 8 ऑक्टोबरपूर्वी कागदपत्रे जमा करावीत, अन्यथा अनुदान डीबीटी पोर्टलमध्ये डाटा एन्ट्री होईपर्यंत स्थगित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्जीकल स्ट्राईक हा भारताच्या शौर्याला अधोरेखित करणारे प्रतिक - ब्रिगेडिअर सुनील गावपांडे

Tue Oct 1 , 2024
▪️ नागपूर येथे शौर्य दिन साजरा  नागपूर :- कोणत्याही परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना ही दक्ष आहे. सर्जीकल स्ट्राईक हा भारताच्या शौर्याला अधोरेखित करणारे एक प्रतिक आहे. देशाच्या शांततेला, कुठल्याही भूमीला, कोणता देश जर वाईट हेतूने पाहत असेल तर अशा शत्रू राष्ट्राच्या सिमेत जाऊन त्यांना आम्ही धडा शिकविणाऱ्यांपैकी आहोत, असे उद् गार ब्रिगेडिअर सुनील गावपांडे ( नि.) यांनी काढले. बचत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com