शनिवार (दि.२३) एप्रिल ला एकात्मिक कुक्कुट पालन विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रा प खंडाळा (घटाटे ) येथे पशु वैद्यकीय दवाखाना कन्हान यांचे विद्यमाने जि प नागपुर अध्यक्षा मा सौ रश्मीताई बर्वे यांच्या हस्ते परिसरातील लाभार्थ्याना २३ मादी, ३ नर कावेरी प्रजाती च्या कोंबड्या व त्यासाठी पक्षीघर चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जि प विरोधी पक्षनेते व जि प गोंडेगाव-साटक सदस्य मा व्यंकटेश कारेमोरे, प स पारशिवनी सभापती मीनाताई कावळे, पशु वैद्य कीय अधिकारी वाळके मॅडम, खंडाळा सरपंचा सौ विमल बोरकुटे, उपसरपंच चेतन कुंभलकर प्रामु ख्याने उपस्थित होते. यावेळी परिसरातील खंडाळा, गहुहिवरा, निलज, खेडी, बोरडा येथील २१ लाभार्थ्यां ना वाटप करून लाभ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पशु वैद्यकीय अधिकारी वाळके व त्यांचे सह कर्मचारी, ग्रा प सचिव व्ही के गहाने आणि कर्मचारी आदीने सहकार्य केले.
खंडाळा येथे लाभार्थ्याना कोंबडया व पक्षीघर वाटप
कन्हान : – एकात्मिक कुक्कुट पालन विकास कार्यक्र मा अंतर्गत ग्रा प खंडाळा (घटाटे) येथे पशु वैद्यकीय दवाखाना कन्हान यांचे विद्यमाने परिसरातील लाभा र्थ्याना २४ मादी , ३ नर कावेरी प्रजाती च्या कोंबडया व पक्षीघर वाटप करण्यात आले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com