बेल्ज‍ियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्ज‍ियम वाणिज्यदूतांची माहिती

– हिऱ्यांशिवाय लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार

मुंबई :- बेल्ज‍ियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार – उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्ज‍ियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्ज‍ियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली.

वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बेल्ज‍ियमचा महाराष्ट्र आणि गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्ज‍ियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले.

बेल्ज‍ियम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्ज‍ियम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश 

Tue Oct 22 , 2024
नई दिल्ली :- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे. माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!