शासनकर्ती जमात बना, हीच शूरवीरांना खरी श्रद्धांजली – डॉ.हुलगेश चलवादी

– ईव्हीएम मुळे होणारा ‘वैचारिक दहशतवाद’ संपवण्याचे आवाहन 

पुणे :- अस्पृश्यतेविरोधातील एल्गार आणि अस्मितेचा हुंकार असे भीमा-कोरेगावच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शूरवीर ‘महारां’नी’ आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या फौजेचा पराभव करीत इतिहास लिहला. ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवत १ जानेवारी १८१८ रोजी अवघ्या १६ तासांमध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला.

पंरतु,आज शासनकर्ती समाज बनण्यासाठीच्या प्रक्रियेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचा लढवय्या बाणा बोथट झाला आहे. राज्यात बहुजनांचे शासन नाही. आता शासनकर्ती जमात बनने हीच भीमा कोरेगाव लढाईतील शहीद शूरविरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया बसपाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.१) भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर व्यक्त केली. यावेळी बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनिल डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीद वीरांना मानवंदना देत बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन बहुजन समाजाच्या एकसंधतेचा निर्धार व्यक्त केला. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे, किरण, महेश जगताप, अशोक गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, सुशील गवळी, अनिल त्रिपाठी, संदीप कांबळे, प्रवीण वाकोडे, नागसेन माला, बाळासाहेब आव्हारे, संतोष सोनावणे यांचा सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बहुजनांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नरत रहा-अँड. सुनील डोंगरे

अवघ्या ५०० महार रेजिमेंटने पेशवाईचा पर्यायाने त्यांच्या अस्मितेला नाकारणाऱ्या विचारसरणीचा पराभव केला. ही ऐतिहासिक घटना जागतिक पातळीवर आपला विशेष असा ठसा टिकवून आहे. महारांचा गौरवशाली इतिहास देशात असलेल्या लोकशाहीचा महत्वाचा पाया आहे. बसपा कॅडरने या लढाईचा आदर्श घेत राज्यात आता बहुजनांचे सरकार आणण्याच्या कार्याला लागले पाहिजे, असे प्रतिपादन बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.सुनील डोंगरे यांनी केले. समाजात वैचारिक दहशतवाद माजला आहे. अशा दहशतवादाचा मुकाबला विचारप्रसाराच्या शस्त्रानेच करता येईल, असे मत यावेळी अॅड.डोंगरे यांनी व्यक्त केले.

बहुजनांचे राजकारण संपवण्यासाठी ईव्हीएमचा वापर-डॉ.चलवादी

समाजात हल्ली वैचारिक दहशवाद माजतो आहे.राजकारणातून बहुजनांना संपवण्यासाठी ‘ईव्हीएम’च्या वापर केला जात असल्याचे जाणवतेय. परंतु, ईव्हीएम चा वापर करीत पसरवला जाणारा हा दहशतवाद केवळ ‘भीमा कोरेगाव’ सारख्या लढाईनेच संपवता येईल.मात्र, या लढाईचे स्वरूप बदलले असून आपल्या विचारांचा अधिक प्रचार-प्रसार करूनच हे युद्ध जिंकता येईल,असे डॉ.चलवादी म्हणाले.शासन समाज बनण्याचा संदेश अप्रत्यक्षरित्या या शूरवीर महार सैनिकांनी दिला.जर महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप विचारसरणीला धडा शिकवायचा असेल, तर आंबेडकरी समाजाने एक निळ्या झेंड्याखाली, हत्ती या निवडणूक चिन्हाखाली ‘बहुजनांसाठी’ एकत्रित येत स्वत:चे सरकार बनवले पाहिजे. शासनकर्ती जमात होणे, हेच या शूरवीरांना खरे अभिवादन ठरेल असे डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवीन वर्षात थकीत मालमत्ता करावरील शास्ती / दंड 80 टक्के माफ होणार

Thu Jan 2 , 2025
– मनपाद्वारे नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट नागपूर :- नागपूरकर जनतेला नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदाराकडून थकीत मालमत्ता कर रक्कमेवर लागणारी शास्ती / दंड 80 टक्के माफ करण्याची महत्वाकांक्षी “मालमत्ता कर अभय योजना 2024-2025” नागपूर मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. 01 जानेवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!