प्रशासनाच्या अभयपणामुळे कामठी तालुक्यात अवैध गुटखा विक्री जोमात!

– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 26:- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे असतानाही कामठी बस स्टँड जवळील सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथालय समोर चक्क पांनठेले लावलेले आहेत ज्यामुळे या अनाथलयात राहनारे विद्यार्थी या शौकीला बळी पडू शकतात मात्र स्थानिक प्रशासनाच्या अभयपणामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात सर्रास गुटखा व तंबाकुजन्य पदार्थाची विक्री करण्यात येत असून अशा विक्रेत्यांवर कारवाही करण्याऐवजो स्थानिक पोलीस व अन्न औषधी प्रशासन विभाग विभागाचे अधिकारी आपले आर्थिक स्रोत वाढविणाऱ्यावर भर देत असल्याने तालुक्यात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थाची विक्री जोमात सुरू आहे.
राज्यात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असताना सुद्धा कामठी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा तसेच तंबाकुजन्य पदार्थाची विक्री खुलेआम पद्ध्तीने जोमात सुरू आहे. अशा व्यवसायिकांवर कार्यवाही करण्याची जवाबदारी पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांची आहे मात्र कामठी तालुका अशा कार्यवाही साठी अपवाद ठरत आहे.तर उलट अन्न व औषधी प्रशासन विभाग धृतराष्ट्रांची भूमिका घेत आहे.
लगतच्या तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथुन येथील व्यापाऱ्यांकडे गुटखा व तांबकुजन्य पदार्थ उतरविण्यात येत आहे.याची माहिती सुदधा पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना असल्याची ओरड सुरू आहे.मात्र आर्थिक लाभपोटी वरील दोन्ही विभागाचे अधिकारी गुटखा व तंबाकूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कारवाही करीत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान

Sat Feb 26 , 2022
मुंबई – श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही.  कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे ‘कामगार मित्र‘ पुरस्कार शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com