संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी ने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करीत विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कोराडी येथील विद्या मंदिर शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व सर्व शिक्षकांना मार्गदर्शीत केले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले की यावर्षी 15 ऑगस्ट 2022 ला भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे शासनाने जाहीर केले असून या उपक्रमा अंतर्गत आपल्या अस्मितेचा प्रतीक असणारा राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येक घरी 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान फडकवायचा आहे त्या अनुषंगाने आयोजित या उपक्रमा विषयी व ध्वज संहिता विषयीची माहिती दिली सोबतच व्हिडीओ चित्रफिती द्वारे सुद्धा हर घर तिरंगा अभियानाची विस्तृत माहिती दिली.याप्रसंगी शालेय विद्यार्थीसह शिक्षक गण उपस्थित होते