संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रशासनात शासकीय नोकरदार म्हणून कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना नैसर्गिक नियमाप्रमाणे बदली हा नियम लागू होतो व त्यानुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलीवर जावे लागते मात्र अशा वेळी विभाग प्रमुख म्हणून आपली कर्तव्यदक्ष भूमिका साकारत असताना कामठी पंचायत समितीच्या महिला गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी मागिल तीन वर्षांच्या कार्यकाळात एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख करून सर्वांच्या मनात आपल्या सुजाण व प्रभावशाली ,मनमिळाऊ अशा व्यक्तीमत्वाचे धनी म्हणून ठसा उमटवला असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक मनीष दिघाडे यांनी पंचायत समिती कार्यालयात आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
कामठी पंचायत समितीच्या महिला गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांची कळमेश्वर पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून यासंदर्भात त्यांना कार्यालयीन अधीकारी ,कर्मचारी तर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला याप्रसंगी त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.दरम्यान बीडीओ अंशुजा गराटे यांनी सुद्धा भावनिक असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, माजी सभापती उमेश रडके, गटशिक्षण अधिकारी केवल दुर्गे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुजितकुमार अढाऊ,अक्षयकुमार मंगरुळकर,विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, गोपीचंद कातुरे,विजय चौधरी,राजू काळे ,विजय तिडके यासह पंचायत समिती सदस्यगण,ग्रामसेवकगण, तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारीगण उपस्थित होते.