– पत्र परिषदेत माहिती
नागपूर :- मागील दोन वर्षापासून 2022 च्या अनुसूचित जातीच्या 763 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना अजून पर्यंत फेलोशिप न मिळाल्याने आंदोलनाचे अंतिम शस्त्र म्हणून संशोधक विद्यार्थी स्वतः 5 जुलैपासून पुण्याच्या बार्टी कार्यालय समोर आमरण उपोषणावर बसणार आहेत अशी माहिती आज बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 चे संशोधक विद्यार्थी उत्तम शेवडे व अंकित थुल यांनी नागपुरात घेतलेल्या पत्र परिषदेत दिली. सोबतच 07 ऑगस्ट पासून होणाऱ्या कागदपत्र तपासणी (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) वर बहिष्कार असंल्याने कागदपत्रांची तपासणी करणार नाही व करू देणार नाही अशीही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचे सांगितले.
ओबीसीच्या 1236 व मराठाच्या 851 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देणारी महाराष्ट्र सरकार मात्र अनुसूचित जातीच्या 863 विद्यार्थ्यांपैकी एकालाही एकही पैसा देत नाही. व उलट 25 जुलै 2024 रोजी एक जीआर काढून 50% फेलोशिप घेण्याचे आवाहन करते. एवढेच नाही तर नोंदणी दिनांक ऐवजी अलॉटमेंट लेटर पासून फेलोशिप देणार असल्याचे सांगते. त्यामुळे विद्यार्थी समिती या जीआर ला काळा जीआर संबोधून नोंदणी दिनांक पासून 100% फेलोशिप मिळत नाही तोपर्यंत या सरकारचा व काड्या जीआर चा निषेध करण्याची घोषणा केली.
पत्रपरिषदेला उत्तम शेवडे, अंकित राऊत, नितीन गायकवाड, प्रणित गजभिये, मंगेश दुतोंडे, विजया नगरारे आदि पीएचडी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.