अनुसूचित जातीच्या सार्वांगिण विकासासाठी बार्टी कटिबध्द – धम्मज्योती गजभिये

नागपूर : बार्टीच्या माध्यमातून मांग गारुडी समाजाचे सर्वेक्षण नागपूर येथे करण्यात आले असून त्यांच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच दिल्ली येथे युपीएससी च्या प्रशिक्षणाकरीता 200 विद्यार्थ्यांची मर्यादा आता 300 करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षात निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजना राबविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. मात्र आता बार्टीला जवळपास 250 कोटी रुपयांचा शासनाकडून मिळाला आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या सर्वांगिण विकासासाठी बार्टी कटिबध्द असल्याचा विश्वास बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी विविध सामजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या(बार्टी) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम त्यासोबतच प्रशिक्षण शिबीरामुळे अनुसूचित जातीतून चांगले उद्योजक व उच्चपदस्थ अधिकारी निर्माण व्हावे, यासाठी बार्टी कटिबध्द असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बार्टीच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. एमसीईडीच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात उद्योजकता शिबीर सुरु असून या माध्यमातून अनुसूचित जातीतून चांगले उद्योजक निर्माण व्हावे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आयबीपीएस, पोलीस भर्ती, एमपीएससी, युपीएससी यासारख्या विविध स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण सर्वत्र दिल्या जात असल्याचे ते म्हणाले.
भविष्यात बार्टीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती या निमित्ताने त्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित

Sat Jul 23 , 2022
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने 5 सप्टेंबर 2016 च्या सर्वसमावेशक सूचनेनुसार शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. 1 नोव्हेंबर2022 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार यांद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केले आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कळविले आहे. 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 अन्वये जाहीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com