डिजिटल क्रांतीमुळे अनेकांच्या खिशात आली बँक,अलीकडे एटीएम केंद्रही पडताहेत ओस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आजच्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झाली असून यूपीआयमुळे एटीएम वरील व्यवहार सुमारे 30 टक्क्यांनी कमी झाला असून बरेच आर्थिक व्यवहार हे गुगल पे, फोन पे आदिच्या माध्यमातून मोबाईल ने होत आहेत त्यातच खिशात रोख रक्कम नसली तरी मोबाईल मध्ये असलेल्या यूपीआय सुविधे मुळे आर्थिक व्यवहार होत आहेत त्यामुळे एटीएम केंद्रात जाणाऱ्यांची संख्या कमी होत चालली असून या डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या खिशात बँक आल्याचे दिसून येते.

पूर्वी बँक खात्यात जमा असलेले पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएम केंद्रात जावे लागत असे मात्र आता बँकच खिशात समावली असल्याने डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेतव.यूपीआय मुळे एटीएम वरील व्यवहार बरेच कमी झाले आहेत .दिवाळी सारख्या सण तोंडावर असून रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम केंद्रात मोठ्या रांगा दिसत नाही.पूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएम मधून काढून पगार घरी आणत असत मात्र आता अनेकजण एटीएम मध्ये जात नसल्याचे दिसून येत नाहीत त्यामुळे पगार आता मोबाईल मध्येच राहत आहे .

मागील काही महिन्यात यूपीआय मुळे डिजिटल व्यवहार वाढले आहेत.पूर्वी पेट्रोलपंपावर रोख व्यवहार व्हायचा मात्र आता यूपीआय आल्यामुळे पेट्रोल पंपावर देखील यूपीआय चा वापर करून पेट्रोल टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.काही ठिकाणी किराणा दुकानात,चहाच्या टपरीवर सुद्धा डिजिटल व्यवहार होऊ लागले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठ सजली

Tue Nov 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -विद्दूत रोषणाईने घरे सजवायला सुरुवात, बाजारपेठेत उत्साह कामठी :- दिवाळी सण अवघ्या तोंडावर असून दिवाळी सणाच्या स्वागतासाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठ सजली असून बाजारामध्ये आकाश कंदील,पणत्या व विजेवरील तोरणे यांचा झगमगाट दिसुन येत आहे. यावर्षी दिवाळी सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होणार असल्याचे एकंदर वातावरण दिसुन येत आहे.दिवाळी म्हटली की प्रत्येक घरात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!