काटोल/कोंढाळी :- बैंक आफ इंडिया तर्फे बँक कर्ज सेटलमेंट योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी कडून कृषी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम बँक परतफेड समझोता योजनेचे बाबद ची माहिती. बैंक आफ इंडिया चे प्रमोद कुमार, सहाय्यक महाव्यवस्थापक (वसुली), प्रमोद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, बैंक आफ इंडिया शाखा कोंढाळी चे व्यवस्थापक विशाल पाठक व कोंढाळी शाखेच्या कृषी अधिकारी सुजाता ढबाले यांच्या उपस्थितीत, 09 डिसेंबर रोजी सकाळी. सकाळी 11-00 वाजता किसान बँक कर्ज समझोता योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यांनी बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी अंतर्गत जुन्या व नवीन कर्जाची एकरकमी परतफेड केल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांसाठी एकरकमी समझोता कर्जमुक्ती शिबिराचे आयोजन करताना बँक ऑफ इंडिया कोंढाळी येथील शाखेचे प्रशासक विशाल पाठक यांनी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांना एकरकमी तडजोड करून कर्जमुक्ती देण्यासाठी या योजनेची माहिती दिली. कृषी अधिकारी सुजाता ढबाले यांनी एनपीए कृषी कर्ज खात्यातील थकबाकीदार तसेच अन्य शेतकऱ्यांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. बँक मित्र अंकित तागडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.