पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक तुकडे उडविण्यावर बंदी

– दंड व फौजदारी कारवाई होणार 

चंद्रपूर :- शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर मशीनचाही वापर केला जातो ज्या०ला सीओटू पेपर ब्लोवर मशीन म्हणतात. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात कागदांचे अथवा प्लास्टीक कागदांचे तुकडे एका वेळेस हवेत उधळल्या जातात. हे दृश्य पाहण्यास मोहक वाटत असले तरी त्या एका ब्लास्टने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर जमा होतो, मग रॅली अथवा कार्यक्रमात उपस्थीत लोकांच्या चालण्याने ते कागद रस्त्यावर असे घट्ट चिपकतात कि, ते काढतांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना फार त्रास होतो.

आज आपल्या शहरात कुठलीही रॅली निघाली तरी ती रॅली संपताच रस्ते स्वच्छ आढळुन येतात कारण मनपा स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेप्रती जागरूक असतात. नागरीक म्हणुन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आपलेही कर्तव्य आहे तेव्हा मनपातर्फे आवाहन करण्यात येत आहे कि,सार्वजनिक कार्यक्रम अथवा रॅलीमध्ये पेपर ब्लोवर मशीनचा वापर करून कागद अथवा प्लास्टीक तुकडे हवेत उडवु नये अन्यथा सदर मशीन,सदर वाहन जप्त करण्यात येऊन संबंधितांवर घनकचरा अधिनियमानुसार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरातील खेळाडूंना सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Oct 7 , 2023
– २३व्या डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवाचा पुरस्कार सोहळा नागपूर :- शहरातील मुले मैदानांवर खेळली पाहिजे, यासाठी साडेतीनशे मैदाने तयार होत आहेत. यातील दीडशे मैदाने सज्ज झाली आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकातील खेळाडूला आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com