संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- काही वर्षे अगोदर केसांवर फुगे मिळायचे ,नंतर केसांवर भांडी आता मात्र केसांवर पैसे मिळायला लागले आहेत.होय खरं आहे .कवडीमोल किंमत असणाऱ्या केसाला मोल आलंय. आधुनिक जमान्यात खाण्याच्या गोष्टी स्वस्त आणि सौंदर्याच्या वस्तू महाग झाल्या आहेत.कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या केसांना आता प्रतिकिलो तीन हजार रुपयाचा भाव मिळत आहे.
ताण तणाव तसेच आहार विहारातील बदल यामुळे धावपळीच्या जीवनशैलीत जन्मजात नैसर्गिक सौंदर्याला दृष्ट लागतेय.केस म्हटले की शरीराचे संरक्षक कवच .डोक्यावरील केस उन्हापासून बचाव करतोय तसेच चेंहऱ्याचे सौंदर्य फुलवतात ,रुबाब वाढवितात त्यामुळे व्यक्तिमत्वही फुलून दिसते .पुरुषांची मिशी आणि हेअर स्टाईल तसेच महिलांचे केसांचे आकडे, वेणी .कधीकाळी।सर्वसामान्यांना केसांचे आजच्या इतके महत्व नव्हते आता हे मत बदलत चालले आहे त्यामुळे केसांना महत्व आले आहे.पुरुषांना डोक्यावर टक्कल नको असते तर महिलांना दाट ,लांबसडक ,काळेभोर केस हवे असतात यामागे सौंदर्य वाढण्याबरोवरच वय लपविण्याचाही अनेकांचा हेतू असतो म्हणून केसांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी पुरुष असो वा महिला ,जीवाचं रान करतात त्यासाठी घरगुती उपाय,जडिबुटी ,अथवा वैद्यकीय उपचारावर हजारो रुपये खर्च केले जातात मात्र शेवटी वय लपत नाही आणि हाती काहीच येत नाही.पूर्वी वय वाढल्यावरच केस पांढरे व्हायचे किंवा गळायचे आता मात्र केस अकालीच पांढरे होतात तसेच टक्कलही आता लवकर पडते ,काही लोक हे वास्तव स्वीकारतात परंतु बऱ्याच जणांना हे असे वय वाढणे सहन होत नाही मग केसांचे कृत्रिम टॉप बसवून टक्कल झाकले जातात किंवा केशरोपणाचा नवीन पर्याय स्वीकारावा लागतो .आता जमाना बद्दललाय .केसांवर फुगे घ्या म्हणणारे आता केसांचा भाव करू लागले आहेत .किलोला तीन हजाराचा दर देऊ लागले आहेत.महिलांच्या डोक्यावरील गळनाऱ्या केसांनी महिलांची समस्या वाढवली असली तरी दुसऱ्या बाजूंने केस पैसेही देऊ लागले आहेत.
-दारोदार फिरून गोळा होणाऱ्या केसापासून महिलांची कृत्रिम बुचडे, गंगावन ,टाईज,विग बनविण्यासाठी केसांचा वापर केला जातो.पुरुष व महिला अशा दोघांच्याही केसगळतीचे प्रमाण वाढल्याने कृत्रिम केसांच्या वस्तूची मागणी वाढली आहे त्या तुलनेत उपलब्ध होणाऱ्या केसांचा पुरवठा कमी असल्याने जशी वस्तूंची मागणी वाढत गेली तसा केसांचा भाव वाढत गेला.
@ फाईल फोटो