संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महाबली बळीराजा पुजन, फोटो, कॅलेंडर व अल्पोहार वितरण केले
कन्हान :- भारतीय सिंधु, कृषी संस्कृतीचा महानायक, कुळस्वामी, प्रजाहितदक्ष, तिन्ही लोंकाचा स्वामी, महादानशुर, महाबली, महासम्राट बळीराजा महोत्सव मराठा सेवा संघ कन्हान व्दारे महाबली बळीराजा, राष्ट्रमाता जिजाऊ सह महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन, फोटो, कॅलेंडर व अल्पोहार वितरण करून साजरा करण्यात आला.
मराठा सेवा संघ कन्हान व्दारे मंगळवार (दि. १४) ला बलीप्रतिपदेला शिवश्री शांताराम जळते यांच्या बंगल्याच्या टेरेसवर मराठा सेवा संघ कन्हान उपाध्यक्ष ताराचंद निंबाळकर यांचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुर्यकांत तिडके, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा माया इंगोले यांच्या हस्ते महादानसुर बळीराजा व राष्ट्रमाता जिजाऊ सह महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन आणि बळीराजा, जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी शांताराम जळते, विनोद बांते, माया इंगोले आदीने दिवाळीला ” इडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे !!” म्हणुन सुमारे ३००० वर्षापासु न समस्त भारतीय ज्याच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करित आहेत, अश्या भारतीय सिंधु, कृषी संस्कृतीचा महा नायक, कुळस्वामी, समतावादी, प्रजाहितदक्ष, तिन्ही लोकांचा स्वामी, महादानशुर, महाबली, महासम्राट बळीराजा हा ” माझी प्रजा, अन्नदाता शेतकरी सुखी भव: ” म्हणुन सतत काळजी घेणारा, इतका जीवलग की सात काळजाच्या आत कायम जपुन ठेवावा. दिवा ळीला कोकण, मराठवाडा, विदर्भ व दक्षिणेत ओनम सणाला तसेच भारतात बऱ्याच स्थळी महासम्राट बळी राजाची आपआपल्या घरी व सार्वजनिक ठिकाणी फोटो किंवा प्रतिमा पूजन करून, सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुक काढुन अभिवादन करून महोत्सव साजरा करतात असे मार्गदर्शन केले.
राकेश घोडमारे हयानी शिव गीत गायन केले, तसेच पुरातन काळा तील शेतक-यांचा महासम्राट राजा बळीराजा विषयी मा. ताराचंद निंबाळकर हयानी अध्यक्षिय मार्गदर्शन केले. तंद्ंतर उपस्थित सर्वाना महासम्राट बळीराजाची फोटो, कॅलेंडर व अल्पोहार वितरणाने बळीराजा महो त्सव साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन शाताराम जळते हयानी तर आभार मोतीराम रहाटे यांनी व्यकत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा माया इंगोले, लता जळते, रंजना इंगोले, मराठा सेवा संघ कन्हान समन्वयक शांताराम जळते, तालुकाध्यक्ष मोतीराम रहाटे, उपाध्यक्ष ताराचंद निंबाळकर, वसंतराव इंगोले, संदीप कुकडे , राजु नागपुरे, देवराव गोतमारे, योगराज अवसरे, बबन राव इंगोले, भगवान कडु, शंकरराव कोंगे, स्वप्निल मते , सुशिल ठाकरे, महेश काकडे, विठ्ठलराव मानकर, अशोक राऊत, राजेंद्र गाडगे, दिवाकर इंगोले, संभाजी ब्रिगेड चे विनोद बांते, राकेश घोडमारे, प्रविण चव्हाण, अमोल डेंगे, देवा तेलोते, आकाश कडु, गजेंद्र कुंभलकर, दिपक उघडे, सुमित खैरकर, अक्षय जळते, अमोल देऊळकर आदीने सहकार्य केले.