संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांनी बँडबाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या शहरातुन मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधुन वृध्द शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यांत चंगाळी शिंगाना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची व इतर पशु धनाची शहरातुन काही सधन शेतकऱ्यांकडुन मिरवणुका काढण्यात आल्या. घरात पुरण पोळीचा स्वयपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. . बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा बैल पोळा सण साजरा करण्यात आला.
बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात.
बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयपाक करुन सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलाना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.