– आरोपी अटक, एकुण ३४ लाख ४५ हजाराचा मुद्दे माल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरुन मागील काही दिवसा पासुन मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीची वाहतुक होत आहे. रविवार रात्री ला बजरंग दल पदाधिका-यांनी गो वंश तस्करीचा केला पर्दाफाश. नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशावरुन कन्हान पोली सांनी आरोपीस अटक करुन त्याचे जवळुन ३४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. बजरंग दलच्या पदाधिका-यांनी गोवंश तस्करीचा पर्दाफाश केल्याने कन्हान पोलीसांच्या भुमि केवर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.२९) डिसेंबर ला रात्री १० ते ११ वाजता दरम्यान बजरंग दलच्या पदाधिका-यांना गुप्त माहिती मिळाली कि, डुमरी खुर्द शिवारात अण्णा लोकांची वस्ती आणि कॅनलचे पली कडे असलेले शेतात कत्तलीकरिता घेवुन जाण्याचे उद्दे शाने गोवंश जनावारे बांधुन ठेवले आहे. अश्या गुप्त माहितीचे आधारे बजरंग दल पदाधिका-यानी जाऊन पाहले असता मोठ्या संख्येत असलेले गोवंश जनावरे कत्तलीकरिता घेवुन जाणेकरीता एक वाहन उभे दिसुन आल्याने पदाधिका-यांनी सदर माहिती नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना दिली असता त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना कारवाईचे आदेश दिल्याने पोलीसानी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता शेतात ६३ गोवंश जनावरांना दोरीचे सहायाने बांधुन ठेवलेले तसेच जनावरांना कत्तलीकरिता घेवुन जाण्याचे उद्देशाने एक लाल रंगाचे आयसर वाहन क्र. एम एच ४० सीटी ४६८० हा खाली उभा असलेला दिसला.
वाहनाची पाहणी केली तर वाहनाचे आतील दोन्ही बाजुच्या पल्ल्याला पोत्यांनी झाकलेले तसेच वाहनाचे वर ताळपत्री बांधलेली, वाह नात खाल्ली कोंढा टाकलेला अशा अवस्थेत आढळुन आले. शेतात एक इसम मोहमद शफीक कुरेशी वल्द अब्दुला करीम कुरेशी वय ४३ वर्ष रा. भाजीमंडी काम ठी हा मिळुन आला. गोवंश जनावरे आणि वाहन यांचे मालकं संबंधी कागदपत्रांची मागणी केली असता शेत मालक मोहमद शफीक कुरेशी बल्द अब्दुला करीम कुरेशी यांनी कोणतेही कागदपत्रे सादर केले नसल्याने पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी ला अटक करित त्याचे जवळुन ६३ गोवंश जातीचे बैल प्रत्येकी १५०० रू प्रमाणे किंमत ९ लाख ४५ हजार रु. आणि आयसर वाहन किंमत २५ लाख रुपये असा एकुण ३४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जप्त गोवंश गोशाळा देवलापार येथे काळजी आणि सरंक्षण कामी दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी मोहमद शफीक कुरेशी बल्द अब्दुला करिम कुरेशी यांचे विरुद्ध अप क्र ९४१/२०२४ कलम ११ (१)(च),(ज),(झ) प्रा.नि.वा. प्रतिबंध कायदा १९६० सहकलम ५ (ब), ९ महा. प्रा. सं. कायदा १९७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर, गुरुप्रकाश मेश्राम, आकाश सिरसाट, गणपत सहारे, सम्राट वनप्रती, अनिल यादव, आशिष बोर कर, बैजनाथ तोटेवार सह पोलीस कर्मचारी हयांनी यशस्विरित्या पार पाडली.