नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ब्रिज स्पर्धेत बजाज संघ चॅम्पियन ठरला. शंकर नगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत विदर्भातील 80 खेळाडूंसह 14 संघ सहभागी झाले. विजेत्या बजाज संघामध्ये व्ही.जे. पुराणिक, जी. दत्ता, व्ही. साबू, एम. लुली आणि एम दत्ता यांचा समावेश आहे.स्र्धेत ब्लॅक टी संघ उपविजेता ठरला. ब्लॅक टी संघामध्ये कुसुम भावे, अर्चना देशपांडे, डी.के. दत्ता, ए.जी. करंदीकर, एम.आय. हरारवाला आणि आर.खान यांचा समावेश आहे. मोहोता संघ तिस-या स्थानावर राहिला. मोहोता संघामध्ये बसंत मोहोता, एस. छाज्जेड, जी. सुंदरमूर्ती आणि समीर रॉय यांचा समावेश आहे.. एस के पटनी, एस वाटवे, पी.के. कर, डी. दाबके आणि एम. दिवाण यांचा समावेश असलेला संघ चौथ्या स्थानावर राहिला.
24 डील समूह गटात व्ही.जे. पुराणिक आणि एम. लुली यांनी सर्वोच्च सन्मान मिळविला. एस.छाज्जेड आणि अरुण पुराणिक यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. राजा आणि अमित रेवतकर या पिता-पुत्र जोडीने तिसरा क्रमांक पटकाविला. मुल्ला बंधू साजिद आणि अली यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुधीर अय्यर आणि समीर रॉय हे या ब्रेन गेमचे टूर्नामेंट डायरेक्टर होते. सर्व विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना अश्विनी कुलकर्णी आणि गौरी डोंगरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.