बहुजन रिपब्लिकन एकता मंचने डेंगु, मलेरिया टाईफाईड, चिकन गुनिया व इतर आजार थांबवण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्याकरिता कामठी नगरपरीषदचे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी :- बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ महासचिव अजय कदम यांच्या नेतृत्वात आज बरीएमंच्या शिष्टमंडळाने कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये डेंगु, मलेरिया, टाईफाईट, चिकन गुनिया व इतर आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कामठी शहरात होत असल्यामुळे व त्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा बळी जात असल्यामुळे व हे आजार सर्वत्र पसरत असल्यामुळे या आजारांना आळा घालण्यासाठी नगर परिषद ने यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करावी व अशा जिवघेण्या आजारांपासून कामठी शहराला मुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतांना या शिष्टमंडळात दिपंकर गणविर, उदास बंसोड, अश्फाक कुरैशी, सुभाष सोमकुवर, मनीष डोंगरे, अनुभव पाटील, मनोहर गनवीर, महेंद्र कापसे, सुरेश गजभिये, मो.नासीर ,बंटी रामटेके, उषा भावे, रेखा पाटील, रजनी गजभिये , पुष्पा मेश्राम, स्नेहल तांबे, ईत्यादी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

Wed Aug 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील भिक्कमसिंग चौक यादवनगर,प्रभाग क्रमांक १४ येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच शिबिराकरीता आलेले डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ.गौरव चन्ने, डॉ.भाष्कर हेडाऊ, डॉ.साहेबा शेख यांचे स्वागत नागपूर जिल्हा संघटकप्रमुख राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव,भाविसे उपजिल्हाप्रमुख विनोद यादव, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com