11 एप्रिल ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच चा 16 वा स्थापना दिन

संदीप कांबळे,कामठी
बरीएम स्थापना दिन समारंभाचे उदघाटन श्रीमंत राजे भोसले करतील
बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह
कामठी ता प्र 8:-रिपब्लिकन विचारांच्या लोकांना तसेच अल्पसंख्याक , मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार , भटक्या विमुक्त जाती , महिला आणि सर्व शोषित समूहाला संघटित करून त्यांच्या शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक व राजकीय न्याय हक्काच्या उद्दिष्टांची लढाई लढण्याकरिता बहुजन रिपब्लिकन एकता मंच ची स्थापना करण्यात आली आहे.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच चा 16 वा वर्धापन दिन समारंभ सोमवार 11 एप्रिल 2022 ला सकाळी साडे अकरा वाजता ‘मधुरम सभागृह ‘हिंदी मोरभवन, झांशी राणी चौक, सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.या समारंभाचे उद्घाटन मराठा युवा मंच चे अध्यक्ष श्रीमंत राजे जयसिंह भोसले करणार आहेत.बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापिका संयोजिका व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.तसेच जमाते ईस्लामे हिंद नागपूर चे अध्यक्ष डॉ मोहम्मद अनवर सिद्दीकी व गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाला बहुजन समाजातील कुणबी समाजाचे नेते नितीन चौधरी, तेली समाजाचे नेते रमेश पिसे, माळी समाजाचे नेते अरुण पवार, आदीवासी समाजाचे नेते सुरेश कुंभरे,मातंग समाजाच्या नेत्या इंदूताई मोरे ,गोवारी समाजाच्या नेत्या किरणताई वाघाडे, संत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भावनाताई चौधरी, शाहू समाजाचे नेते उमेश शाहू, पोवार समाजाचे नेते लालचंद चौधरी यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याकरिता विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या 16 व्या स्थापना दिना निमित्त सोमवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी आयोजित कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीत आपले अमुल्य योगदान देणारे विनायक जामगडे, पूरुषोत्तम भांगे, घनश्याम फुसे, नारायण बागडे, सिद्धार्थ कांबळे, नारायण नितनवरे, पी एस डबले, केशव सोनेकर, रमेश घरडे, सुनील मोटघरे इत्यादी मान्यवरांचो प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी त्यांचे स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे संचालन बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या नागपूर शहर अध्यक्षा व नागपूर महानगर पालिकेच्या धंतोली झोन च्या माजी सभापती वंदनाताई भगत करणार असून आभार प्रदर्शन बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे विदर्भ महासचिव अजय कदम करतील.गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या स्थापना दीनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.त्यामुळे यावर्षी बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या स्थापना दिना निमित्त कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती उत्खनन सुरु

Fri Apr 8 , 2022
कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती चोरणाऱ्या चोरांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेसचा तहसील कार्यालय वर धड़क मोर्चा नागपुर/ सावनेर  – सावनेर तालुकामध्ये कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती उत्खनन करणाऱ्या लोकांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारेच्या नेतृत्वात युवक कांग्रेसचे कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांना तक्रार देवून वलनी, वाकोडी, खापा ते बड़ेगाव पर्यंत खापा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com