संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान दिनाच्या पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात संविधान तज्ञ व बिआर एसपी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ॲड . सुरेश माने यांचे मार्गदर्शन, ” जागर संविधानाचा ” शाहिरी जलसा गायक अरुण सहारे व गायिका छाया ताई मनोहर यांच्या गायनास उपस्थितीत जनसमुदायाने भरभरून दाद दिली.
बहुजन भागीदारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गदर्शक संविधान तज्ञ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिआरएसपी डॉ. ॲड. सुरेश माने हयानी सध्या भारतात बिजेपी द्वारे अमृतकाल अशा गोंडस नावाखाली बहु जन लोकांची दिशाभुल करून त्यांना गुलाम बनवुन ५ किलो रेशनवर आणण्यात आले. संविधान दिनाच्या पर्वावर सामान्य लोक गाजावाजा करून बाबासाहेबाना मानवंदना देतात येवढ्यावर समाधानी होतात. पण जो पर्यंत तळागाळातील लोकां पर्यंत आपण जागृती करित नाही, तोपर्यंत सामान्य माणुस अमृत काल अशा गोंडस नावाने बळी पडणार आहे. हे समजुन घ्यावे. पुढे माने म्हणाले की या विपरित परिस्थितीत आपल्या लोकांची जबाबदारी खूप वाढते. बहुजन भागीदारी आंदोलनाचा कार्यक्रम ५ महिन्या चा आहे. या कालावधित अंतिम माणसा पर्यंत पोहचुन त्यांना जागृत करावे लागेल. कार्यक्रमास प्रमुख अतिथी सत्कारमुर्ती माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी देखील उपस्थिताना संबोधित करित आवाहन केले की, संविधानामुळे स्त्रियांचे हक्क अबाधित आहेत. संविधानामुळेच आज स्त्री देशाचे नेतृत्व करित आहे. त्यांनी संविधानाचा सन्मान करावा. या आंदोलनात मी स्वतः माने यांच्या पाठीशी उभी आहे. असे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी बिआरएसपी महिला विदर्भ संयोजिका विश्रांती झामरे , प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विषेश फुटाणे आदीनी मार्गदर्शन केले. कन्हान नगराध्यक्षा करुणा आष्टनकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवंनिर्वाचित ग्रा पं सदस्य रविंद्र केने, सतिश घारड, कृपासागर भोवते यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी अडकणे माजी ग्रा प सदस्य खोपडी, रामराव पाटील काटोल आणि योगराज शेंडे खंडाळा (घटाटे) यांनी बिआरएसपी पक्षात प्रवेश घेतला. माने यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. बिआरएस पी प्रदेश महासचिव शांताराम जळते यांनी प्रस्ताविक तर सुत्रसंचालन नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष कृपासागर भोवते हयांनी केले. मंचावर बीआरएसपी विदर्भ महासचिव भास्कर बांबोडे, विदर्भ उपाध्यक्ष सी टी बोरकर, विदर्भ सचिव पंजाबराव मेश्राम, सहसचिव एस डी डोंगरे, बिआरएसपी बुलेटिन नागपुर संपादक एस एस मेश्राम, नागपुर शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद रंगारी, वंदना लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. रिपब्लिकन सांस्कृतिक मंच अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी गायक कलावंतांना सन्मानित केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आम्रपाली वानखेडे, सुकेशनी बागडे, सविता घरडे, नंदा बागडे, वर्षा फुटाणे, सिंधु वाघमारे, पिंकी मेश्राम, दहिवले, फुलझेले , हरिश भेलावे, सुनिल वासनिक, कामठी विधानसभा अध्यक्ष खांडेकर लीहगाव, गौतम जांभुळकर कळमेश्वर, बाळासाहेब मेश्राम आदीनी अथक परिश्रम घेतले.