बाबुलवाडा व गरंडा जिल्हा परिषद शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन व रोपटे लाऊन बालक दिन उत्साहात संपन्न

पारशिवनी :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या जीवन चरित्रावर मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी प्रकाश टाकला. बालक दिनाच्या निमित्ताने लोकल टू ग्लोबल महाराष्ट्र राज्य सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनन्या कोहळे, मानव बावणे यांनी प्रथम, नैतिक धोटे याने द्वितीय तर श्रेयस वाटकर, सृष्टी धोटे, नयन निंबुळकर, वंश डाफ यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच याप्रसंगी शाळेतील परिसरात गुलाबाची रोपटे लावण्यात आली. तसेच बाबुळवाडा गावी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु जयंती,बालक दिन कार्यक्रम संपन्न! या प्रसंगी शाळेचे मुख्य अध्यापक उमाकांत बांगळकर यांनी पुष्पमाला अपर्ण करून शाळेतील मुलाना व गावातील नागारिक उपस्थितयांना पं जवाहर लाल नेहरू यांचे जिवनातील प्रेरणादायक प्रसंगची माहीती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माहुली से मनसर रोड पर राजस्व विभाग की कार्रवाई में बालू चोरी कर ले जा रहे ट्रैक्टर समेत दो आरोपीयो पर कार्यवाही.

Thu Nov 17 , 2022
पारशिवनी : पारशिवनी तालुक के राजस्व विभाग के तहसीलदार प्रशांत सागडे के मार्गदर्शन में रात्र कालिन गस्त पथक टीम ने आज सोमवार तड़के माहुली गाव से मनसर मार्ग पर में अवैध रूप से रेत ले जा रहे बिना नंबर के ट्रैक्टर को पकड़ा. राजस्व विभाग के अधिकारियों ने बताया कि बालू सहित ट्रैक्टर को जब्त कर आरोपी के नाम बंटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com