संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकप्रिय बाबु हरदास एल. एन. यांच्या 119 व्या जयंती निमित्त ड्रॅगन इंटरनेशनल स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये रांगोळी, चित्रकला व फुड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये मोठया प्रमाणात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
रांगोळी स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक संस्कृति पिंपरहेटे तर द्वितीय क्रमांक संपदा हटवार , व चित्रकला स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक अस्पीता मराठे तर द्वितीय क्रमांक अमिषा तितरमारे तसेच फुड स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक आदित्य रामटेके, द्वितीय क्रमांक राजीक शेख यांनी पटकावला. स्पर्धे मध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांना हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देवून सम्मानित करण्यात आले.
आयोजित विविध स्पर्धांना यशस्वी करण्याकरिता ड्रॅगन इंटरनेशनल स्कूलच्या प्रिंसिपल अंबरीन फातिमा, मेघा स्वामी, अभिलाषा रंगारी, खुशबू वारखेडे, किरण वानखेडे, प्रजक्ता भुरे, सेजल मानवटकर, कंचन पिल्ले, दिक्षा पिल्ले, तृप्ति चव्हाण, प्रविण चहांदे ईत्यादींनी अथक परिश्रम घेतले.