नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली व बुद्धिस्ट स्टडी पदव्युत्तर विभागात 12 नोव्हेंबर रोजी जगातील बौद्ध धम्म यावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अमेरिकेचे लामा रांगड्रोल व जपानचे भन्ते तैजो इमानका होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर नीरज बोधी होते.
लामा रांगड्रोल हे तिबेटी बौद्ध धर्माचे आफ्रिकन, अमेरिकन आंबेडकरी लामा आहेत. यांनी सात पुस्तके लिहिली यांना 2021 ला दोनदा नोबेल शांतता पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. यावेळी ते म्हणाले की बाबासाहेबांच्या साहित्याने मला धम्माची दृष्टी मिळाली, नवीन दिशा सापडली, आधुनिक युगासाठी हा दृष्टिकोन पटला, यामुळेच मला तिबेटमध्ये कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. आजही जगाला बुद्धाच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी लामा ह्यांनी केले.
भन्ते तैजो इमानका हे जापान मधील सिएटल व युएसए मधील बौद्ध मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणून ते नियुक्त आहेत. यांनी जागतिक बौद्ध धम्म या विषयावर बोलताना धम्म प्रचाराच्या कार्यात लोक आपल्याकडे येण्याऐवजी आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ही प्रेरणा मला बाबासाहेबांच्या कार्यातून मिळाली. बाबासाहेबां सारखा खंबीरपणा व दृढनिश्चय करूनच जीवनात यश प्राप्त होऊ शकते असे ते म्हणाले.
ह्या दोन्ही आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वान आंबेडकरी बौद्ध धम्मगुरूंना पाली व बौद्ध अध्ययन विभागात परिसंवादासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना विभाग प्रमुख प्रो डॉ. निरज बोधी म्हणाले की जगात सर्वत्र आण्विक युद्धाचे वातावरण असताना मानवतेला व जगाला वाचविण्यासाठी बौद्ध धम्म अंगीकारल्या शिवाय पर्याय नाही.
याप्रसंगी पाहुण्यांचा परिचय मंगेश दहिवले व संदीप बडोले यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुमती कांबळे यांनी, त्रिशरण पंचशील प्रा. सरोज वाणी यांनी तर समारोप एडवोकेट विजय जांगळेकर यांनी केला.
पाहुण्यांचे स्वागत, धम्मदान शिक्षकांच्या वतीने प्रा डॉ. तुळसा डोंगरे, प्रा डॉ. ज्वाला डोहाने, प्रा डॉ. सुजीत बोधी, प्रा ममता सुखदेवे, प्रा पुष्पा ढाबरे, प्रा रोमा शिंगाडे, प्रा डॉ. बिना नगरारे, डॉ प्रतिभा गेडाम आदिंनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, कैलास घोडेस्वार, ऍड विजय धांडे, हर्षवर्धन जिभे, अड विलास राऊत, डॉ अर्चना लाले, रुचा जीवने, भारती खरे, सुभाष बोंदाडे, किशोर भैसारे, दिलीप गायकवाड आदींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम केले.