– काटोलमध्ये प्रचंड भीम गर्जनेने सह निघाला मोर्चा
– विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही. ॲड. याज्ञवल्क्य जिचकार
काटोल :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्याबद्दल पवित्र मंदिर संसद भवनात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ 24 डिसेंबर रोजी काटोल येथील डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौकात अड-याज्ञवल्क्य जिचकार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी पवित्र मंदिर संसदेत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल याज्ञवल्क्य यांच्यासह उपस्थित शेकडो सहकाऱ्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला. आणि शेकडो सहकारी सहकाऱ्यांसह काटोल तहसीलवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारकडून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन काटोलचे तहसीलदार राजू रणवीर यांना देण्यात आले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, व संविधानाला पुष्पहार अर्पण करून व जय-जय भीम , जय भीम जय भीम च्या भीम गर्जने बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांचा अपमान देशातील जनता कदापि सहन करणार नाही.
या प्रसंगी प्रचंड गर्जनेने निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी जीवन गायकवाड, अजय ठाकरे, रवी काकडे, प्रशांत निकोसे, प्रशांत खाडे, विजय गोंडाणे, प्रफुल्ल गायकवाड, प्रमोद मडके, सलीम शेख, सुरज काकडे, भूषण हिवसे, तल्हा खान, प्रफुल्ल तागडे, नितीन अरघोडे, यज्ञेंद्र गावडे, कृष्णा काकडे अंकितसिंह चव्हाण, मंगेश रामदे, ईश्वर तुमडाम, चिंटू राठोड, धनराज डवरे, रिजवान शेख, चंद्रशेखर जिचकार, पियुष फिस्के, आर्यन नाखले, प्रशांत मुंदाफळे, हरीश चरपे, गौरव पोतदार, भगवान ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.