शिवनी (खात) येथे तीन दिवसीय जलस्याची सुरुवात आज पासून गोपालकाल्याने

अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत आदासा अंतर्गत येणाऱ्या शिवनी (खात) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुवक सांस्कृतिक मंडळ शिवनी तर्फे तीन दिवसीय जलस्याची सुरुवात उद्या दिनांक 12 फेब्रुवारी बुधवारपासून गोपालकाल्याने होणार आहे.

गोपालकाल्याचे किर्तन आंभोरा येथील सुखदेवराव कुरकुडे महाराज करणार आहेत. 11 फेब्रुवारी मंगळवारपासून जागृतीने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. 13 फेब्रुवारी गुरुवारला सकाळी दहा वाजता पासून शाहीर प्रमोद चामलाटे यांचे संपूर्ण पार्टीसह राष्ट्रीय संगीत खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता तिकीट दर असलेला नटरंगी अप्सरा कोल्हापूरची प्रस्तुत सोनू पाजी, पूजा सराटे अकोलाकर, भंडारा विरुद्ध नटखट अप्सरा लावणी अँड डान्स ग्रुप पुणे यांच्या दुय्यम डान्सिंग महामुकाबला ,लावणी अँड हंगामा चे आयोजन होणार आहे. 14 फेब्रुवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता पासून वासेरा /हिवरा येथील शाहीर नागोराव वाढई यांच्या संपूर्ण पार्टीसह गोंधळ चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार बबलू बर्वे, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष नरेश मोटधरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल, आदासा सरपंच संजय आतील कर, खात माजी सरपंच कैलास वैद्य,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, देवेंद्र गोडबोले ,माजी पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर ,माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, मौदा नगरपंचायत सदस्य शुभम तिघरे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष विक्की साठवणे ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश तलमले , प्रमुख अतिथी सचिव किरण दमके, माजी पंचायत समिती सदस्या दुर्गा जामवंत ठाकरे, पोलीस पाटील शालिनी गजभिये, राका जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ खराबे, माजी पंचायत समिती सभापती राजकुमार ठवकर, आदासा ग्रामपंचायत उपसरपंच आकाश मारबते, ग्रामपंचायत सदस्यगण आश्विन मेश्राम, अमित लांजेवार, अनिता भोयर, सायत्रा कोडवते, विद्या सार्वे, विनायक धूमनखेडे, धर्मशीला गजभिये ,प्रमिला चौधरी सह गावातील, परिसरातील सामाजिक , राजकीय पदाधिकारी, पुढारी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या तीन दिवसीय जलसा निमित्त आयोजित भरगच्च सामाजिक ,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजक समिती मंडळाचे पदाधिकारी अशोक दळणे, पिंटू पटले ,रवी बागडे ,ईश्वर कोडवते ,अजय बांभोडकर, अंकुश पटले ,आर्यन गजभिये, नीलकंठ बांते, रवींद्र बांभोळकर ,सुरेश गजभिये, देविदास मडावी ,अजय दळणे, मयूर नेताम ,आशिष दळणे, अमित रावते, बाळू वरकडे, कोमल पटले ,राजू वरकडे,विवेक दळणे ,सचिन रावते,सोपाल गजभिये, मनोज कावळे ,अमोल पटले ,गोपाल नेताम, संजय पटले ,प्रणय पटले, प्रवीण रावते ,अतुल पटले ,समीर गजभिये, साहिल नंदेश्वर ,स्वप्निल गजभिये, संजय वरकडे,पंकज पटले, आकाश पटले ,राहुल पटले ,पुष्पराज पटले ,शुभम कावळे, रघुनाथ मडावी ,,गंगाधर दळणे सह समस्त सदस्य गण व नवयुवक समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामवासी परिश्रम घेत असून सहकार्य करताना दिसत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पिपरी (खंडाळा) येथे संगीतमय शिव महापुराण व हरिनाम सप्ताह समारोप आज भव्य महाप्रसादाने

Wed Feb 12 , 2025
अरोली :- पिपरी (खंडाळा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान मंदिर देवस्थान पिंपरी खंडाळा च्या भव्य पटांगणावर संगीतमय शिव महापुराण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन मागील 5 फेब्रुवारी बुधवारपासून प्रवचनकर्ता व्यासपीठाचार्य मारोडी येथील ह भ प कैलासराव वाघाये महाराज यांच्या वाणीतून त्यांच्या संपूर्ण चमूंच्या सहकार्याने सुरू आहे. त्याच्या समारोप आज 12 फेब्रुवारी बुधवारला दुपारी दोन वाजता पासून भव्य महाप्रसादाने होणार असून लाभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!