संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- परमपूज्य महान त्यागी बाबा जुमदेव यांनी सेवक, सेविकांना चार तत्व,तीन शब्द व पाच नियमांची शिकवण दिली असून अंधश्रद्धा व सर्व प्रकारच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा तसेच कुटुंब मर्यादित ठेवण्याचा ,मुलांना उच्च शिक्षण देण्याचा आणि सर्व समाजाशी बंधू भावाने राहण्याचा संदेश दिला असून ज्यांनी बाबा जुमदेवजींची शिकवण विचार अंगिकारली त्याचे जीवन सुखी झाले असून परमपूज्य जुमदेव बाबा यांचे कार्य समाजाला योग्य दिशा व प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी जयस्तंभ चौकात महाणत्यागी बाबा जुमदेव यांच्या 103 व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे स्वागत प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. व सर्व सेवक सेविकांना बाबा जुमदेवजींच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शिका सेविका मंजूळा अच्छेवार , सुधाकर तिरपुडे, सुमित मेरखेड, अक्षय ढोक, राजा मते, अल्केश लांजेवार ,विकी मानकर ,आदित्य वरखडे, पिंटू मेरखेड, गजू मते रुपेश गंधाळे आदी उपस्थित होते.