आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी – मंत्री अमित देशमुख

मुंबईदि. 19 : आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हिरक महोत्सव यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे आयोजन करीत असताना निश्चित कार्यक्रम ठरवून या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयदादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवारउपसचिव विलास थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.

             देशमुख म्हणाले कीसांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्य नाट्य स्पर्धाचित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजनाबरोबरच ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्राचा हिरक’ महोत्सवानिमित्त कोणते कार्यक्रम आणि ते राज्यभरात कोठे आयोजित करण्यात येणार आहेतत्याचे स्वरुप नेमके कसे असेल याबाबतची रुपरेषा विस्तृतपणे सादर करण्यात यावी. जेणेकरुन या कार्यक्रमांचे आयोजन मुंबईसह विभाग आणि जिल्हास्तरावर करण्यात येऊ शकेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कांद्रीच्या झाडीझुडपात चोरीचा ठेवलेला ५० हजार रू. चा चोरीचा कोळशा पकडला

Wed Apr 20 , 2022
संदीप कांबळे, कामठी  – वेकोलि सुरक्षा आधिकारी ची कारवाई कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल. कामठी ता प्र 20 : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ४ कि मी अंतरावर असलेल्या फुकट नगर कांद्री येथे अवैद्यरि त्या वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली खदान चा एकुण ५० हजार रूपयाचा कोळसा आरोपींनी चोरून झाडी झुडपीत साठवुन ठेवलेला चोरीचा कोळसा वेकोलि सुरक्षा आधिकारी रविकात कान्डे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com