– रॉकी महाजन यांची पत्रपरिषदेत माहिती
नागपूर :- आज झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये युनियन चे नागपूर विभागाचे अध्यक्ष कॉ. रॉकी महाजन आणि सेक्रेटरी कॉ. निलेश पाटील यांनी परिषदेत सांगितलें की, अक्सिस बँकेमध्ये काम करणारे कंत्राटी कामगारांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केंद्र सरकार ला अक्सिस बँक प्रशासन ला देणार आहे. सदर आंदोलनात आमरण उपोषणाचा उल्लेख आहे. कॉ. रॉकी महाजन आणि निलेश पाटील सादर आंदोलनात कारण सांगताना म्हणाले की, एप्रिल २०२० पासून या कामगारांच्या पगारात कुठलीही सुधारणा झालेली नाही आहे. कंत्राटदार सेव्हन एस चे संचालक सतीश पूसेगावकर सांगतात की अक्सिस बँकेने सांगितल्या शिवाय आम्ही पगारात कुठलीही सुधारणा करू शकत नाही. तर अक्सिस बँकेचे सहाय्यक एच आर संजीवन कोकणे सांगतात की, आमचा आणि बँकेच्या कंत्राटी कामगारांचा काहीही संबंध नाही.
इतकेच नव्हे तर सी जी आय टि मध्ये २२/०४/२०२४ रोजी झालेल्या मीटिंग मध्ये युनियन ने सादर केलेल्या पत्र व्यवहारही स्वीकारण्यास नकार दिला. यापुढे असेही म्हणाले की, आमचे कंत्राटदार ह्या कामगारांना जो पगार देत आहे ते किमान वेतनापेक्षा जास्त आहे. परंतु सोयीस्करपणे विसरतात की २००७ साली यू टी आय बँकेचे रूपांतर अक्सिस बँकेत झाल्यानंतर २००७ पासून ते २०२० पर्यंत सादर बँकेने युनियनशी चर्चा करून कामगारांच्या पगारात वेळोवेळी सुधारणा केलेली व सादर पगार हा किमान वेतनपेक्षा जास्त आहे. पण संजीवन कोकणे यांनी घेतलेली भूमिका सर्वस्वी पूर्वीच्या प्रथा प्रमाणे वेतन सुधारण्यास नकार देऊन प्रत्यक्षात अनुचित कामगार प्रथा अंमलात आणली आहे. सदर अनुचित प्रथेबाबद केंद्रिय सरकार औद्योगिक न्यायाधिकारण श्रम न्यायालय ह्यांच्या समोर मुंबई व नागपूर येथे प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या केंद्रीय कामगार न्यायालयात पगार वाढीबाबत ही प्रकरण प्रलंबित आहे. ह्याबाबत अक्सिस बँकेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी ह्यांना आम्ही अनेक पत्रे ईमेल पाठऊनही त्यांनी त्याबाबत काहीही एक कारवाई केली नाही. तसेच सेव्हन एस चे संचालक सतीश पूसेगावकर हे आमच्या युनियनच्या सभासदांना सावत्र पणाची वागणूक देत आहेत. इतकेच नव्हे तर आमच्या युनियनच्या नागपूर विभागचे सेक्रेटरी कॉ. निलेश पाटील यांना बिनबुडाचे खोटे आरोप करून बेकायदेशीररीत्या कामावरून निलंबित केलेले आहे. सदर कंत्राटदार इतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना जे सुपरवायझर म्हणून काम करतात त्यांना ३०००/- रु अतिरिक्त देतात. त्यामुळे सदर युनियन ह्या कामगारांच्या वेतन सुधारणा बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. असा आमचा समाज आहे. याचा अर्थ असा आहे होतो की सादर कामगार संघटना व कंत्राटदार सतीश पूसेगावकर यांचे साटेलोटे चालू आहे. म्हणूनच आमच्या युनियनचे जवळ जवळ दीडशे (१५०) सभासद हे आंदोलनात भाग घेणार आहेत. सदर कामगार विदर्भ भागातील बहुसंख्य आहे. फक्त विदर्भ भागातील सभासद सादर आंदोलन करणार आहेत. असेही रॉकी महाजन आणि निलेश पाटील यांनी सांगितले आहे. कॉ.रॉकी महाजन व कॉ.निलेश पाटील पुढे असेही म्हणले की, आमचे आंदोलन हे हिंद मजदुर सभा चे माजी राष्ट्रीय सचिव व आमच्या युनियन चे जनरल सेक्रेटरी कॉ. सूर्यकांत बागल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार असून व कायदेशीर प्रकरण तेच हाताळत आहेत. यावेळी परिषदेला निलंबित सचिव कॉ. निलेश पाटील, विभागीय खजिनदार कॉ.विजय जगताप व महिला विभागाच्या प्रमुख कॉ. क्रांती उपलवर व सक्रिय मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.