संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- डॉ पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती निमित्ताने कृषी विभागातर्फ कामठी तालुक्यात 17 जून ते 1 जुलै 2024 या कालावधीत ‘कृषी संजीवनी पंधरवाडा’ राबविण्यात येत आहे.या कालावधीत तालुक्यात प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन कृषी संजीवनी पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.सदर मोहिमेद्वारे कृषी विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ गावा गावात जाऊन नविन तंत्रज्ञानाचा प्रचार करीत आहेत.कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पिक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते तरी या कृषी संजीवनी पंधरवाड्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नंदनवार यांनी केले आहे.
या पंधरवाड्या अंतर्गत बीजप्रक्रिया जनजागृती, पीएम किसान उत्सव,जमीन सुपीकता जनजागृती,गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, पीक विमा जनजागृती,हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार,सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान,कापूस,भात व ऊस लागवड तंत्रज्ञान, तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान, कृषी महिला शेतकरी सन्मान,महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना,शेतकरी मासिक वाचन,वर्गणीदार वाढविणे ,प्रगतिशील शेतकरी साधणार असून पंढरवाड्याच्या शेवटच्या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.