नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ज्यूडो स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी (ता. १५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवन येथे ही स्पर्धा सुरू आहे. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सुधीर दिवे, स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, देवेन दस्तुरे स्पर्धेचे कन्व्हेनर डॉ. सौरभ मोहोड, केतन ठाकरे, डॉ. पुरूषोत्तम चौधरी, मुकुंद डांगे आदी उपस्थित होते.निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
18 वर्षाखालील मुले
45 किलोखालील – अंश वंजारी, रोहित तुले (दोघे नागपूर), आयुष मुरकुटे (उमरेड)
50 किलोखालील – प्रथमेश लक्षणे (नागपूर), प्रतिक तराळे (एचव्हीपीएम), अनिकेत काळे (अमरावती)
55 किलोखालील – साहिल चौहान (दिग्रस), केविल आलकर (नागपूर), तेजल परवाल
60 किलोखालील – सारंग शहाणे (एचव्हीपीएम), हर्ष पौनीकर (नागपूर), शुधांशू धोबे (हिंगणघाट)
66 किलोखालील – निनाद अरसूड (यवतमाळ), हर्ष समर्थ (नागपूर), सुजल वांढरे (नागपूर)
66 किलोवरील – मेगल सुर्यवंशी (नागपूर), ओम लाचुरे (यवतमाळ), वेद बेंदेले (दर्यापूर)
15 वर्षाखालील मुले
39 किलोखालील – वेदांत मुधोळकर (यवतमाळ), निखील डोंगरे (गोंदिया), प्रथमेश अंधे
40 किलोखालील – भावेश येपरी, उज्वल परखुंडे, अनिकेत कोवे
45 किलोखालील – प्रेम मुडे (हिंगणघाट), प्रद्युम्न दुधकावरे, आशुतोष जयवास (गोंदिया)
50 किलोखालील – रमन शेराम (हिंगणघाट), अविनाश डोंगरे, रोहित टुले (दोघे नागपूर)
55 किलोखालील – तोशी सय्यद (वर्धा), शरजीत देशमुख (दर्यापूर), सन्यक दरांडे (वर्धा)
55 किलोवरील – मीत ठाकुर (अमरावती), स्वराज नासे (दर्यापूर), रोहित मुळे (हिंगणघाट)
18 वर्षाखालील मुली
40 किलोखालील – नंदिनी पाल (हिंगणघाट), वेदांगी घाटी (हिंगणघाट), साक्षी कांबळे (यवतमाळ)
48 किलोखालील – प्रतिक्षा जोगे (हिंगणघाट), स्नेहा डोंगरे (दर्यापूर), दिशा कांबळे (वर्धा)
52 किलोखालील – दिशा खरे (गोंदिया), धनश्री गाथे (वर्धा), माधुरी कुलकर्णी (नागपूर)
57 किलोखालील – ऐश्वर्या घुगरे, तनया तायडे (दोघी दर्यापूर), वैष्णवी कामथे (उमरेड)
57 किलोवरील – आरूषी सुर्यवंशी (अमरावती), हर्षाली तरपते (वर्धा), प्रांजली कावंपुरे (नागपूर)