अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- अमृत महाआवास अभियान 2022-23″ शुभारंभ सोहळा व पुरस्कार वितरण निमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) करिता “सर्वोत्कृष्ठ जिल्हा” म्हणून गोंदिया जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्राम विकास मंत्री गीरीश महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान चिन्ह स्वीकारले.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक प्रमिला जाखडेकर,सभापती मनोज बोपचे,सभापती खोब्रागडे सड़क अर्जुनी,उपमुख्य कार्य.अधिकारी बी.डी.हरिनखेड़े उपस्थित होते.