महापॉवरपे वॅलेटसाठी महावितरणला पुरस्कार

– ग्रामीण भागातील डिजिटल बिल भरणा सुविधा

नागपूर :- छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा करण्यासाठी विकसित केलेल्या महापॉवरपे वॅलेट या सुविधेसाठी महावितरणला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अचिव्हमेंट पुरस्कार मंगळवारी मुंबईत देण्यात आला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. महापॉवरपे वॅलेटचा वापर करून ग्रामीण भागातील दुकानदार अथवा बचत गट बिल भरणा केंद्राची सेवा वीज ग्राहकांना देऊ शकतात. त्यातून त्यांना कमिशनच्या स्वरुपात उत्पन्नही मिळते. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण व निमशहरी भागात ४,८७८ महापॉवरपे केंद्रे आहेत. त्याद्वारे दरमहा १३ लाखापेक्षा अधिक ग्राहक वीजबिल भरणा करतात व दरमहा सरासरी १४७ कोटी रुपयांचा भरणा होतो.

महावितरणच्या कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) श्वेता जानोरकर, उप महाव्यवस्थापक सायली जव्हेरी आणि प्रणाली विश्लेषक (माहिती तंत्रज्ञान) स्नेहल चव्हाण यांनी पेमेंट सिक्युरिटी समिट अँड ॲवॉर्ड्स इंडिया २०२५ या पुरस्कार सोहळ्यात महावितरणतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.

महापॉवरपे वॅलेट ही सुविधा वापरून गावातील किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार, दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारे दुकानदार असे व्यावसायिक वीज ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देऊ शकतात. बचत गटही अशी सुविधा वीज ग्राहकांना उपलब्ध करू शकतात. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या सोईनुसार जवळच्या महापॉवरपे सुविधा असलेल्या दुकानातून वीजबिल भरता येते. ही अत्यंत सोपी पण सुरक्षित बिलभरणा सुविधा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रा.स्व.संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 21 मार्चपासून बेंगळुरू येथे होणार

Thu Mar 6 , 2025
दिल्ली :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी21,22 आणि 23 मार्च 2025 ला बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. बैठकीत 2024-25 चे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक चर्चा करण्याबरोबरच विशेष कामांसाठीचे निवेदन करण्यात येणार आहे. येत्या विजयादशमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!