संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– चार चाकी वाहनासह एक लक्ष दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील कामठी -अजनी- गादा मार्गावर मोटरसायकल स्वार तरुणास बळजबरीने थांबवून मारपीट करून लूटमार करणाऱ्या अट्टल चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून त्याचे जवळून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन सह एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवारला रात्री आठ वाजता सुमारास केली असून अटक आरोपीचे नाव विशाल राधेश्याम बावणे वय 22 वर्षे रा कळमना , नागपूर असे आहे तर इतर सह तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नौशाद परवेज मोहम्मद अयुब अन्सारी वय 22 राहणार ड्रॅगन पॅलेस जवळ नवीन कामठी हा पेंटिंग चे काम करीत असून मोटरसायकल क्रमांक एम एच 40 यु ८७२८ ने 5 जुलै 2022 ला दुपारी चार वाजता सुमारास आपल्या मित्राला घेण्याकरिता अजनी गादा मार्गे कन्हान कडे जात असताना अज्ञात चार आरोपी नेरी शिवारातील एचपी पेट्रोल पंप समोर थांबवून त्याला मारपिट करून त्याच्या जवळील ओपो कंपनीचा मोबाईल फोन किंमती दहा हजार रुपये घेऊन चारही आरोपी पांढऱ्या मारुती व्हॅन ने नागपूरच्या दिशेने पळून गेले . यासंदर्भात पीडित फिर्यादी नौशाद अन्सारी याने नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्रार केली असता पोलिसांनी कलम 392, 341 ,504 ,34 भादविनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मोबाईल हँडसेटच्या आधारे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी आरोपी विशाल राधेश्याम बावणे वय 22 नवकन्या नगर राजाभाऊ चौक कळमना नागपूर याला गुरुवारला रात्री आठ वाजता सुमारास अटक करून त्याचे जवळून गुन्ह्यात वापरलेले मारुती व्हॅन क्रमांक एम एच 31 एजी 4512 किंमत एक लाख दहा जप्त करून नवीन कामठी पोलीस स्टेशनला आणले व अटक केली त्याच्यासोबत इतर तीन आरोपी पसार असून त्यांना लवकरच अटक करून त्यांचे जवळून अजून काही लुटमारी चोरीचे गुन्हे उघडतील येणार असल्याचे नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे यांनी सांगितले आहे .
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड ,सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे ,दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे याचे मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक शाम वारंगे, संजय पिल्ले, संतोषसिंग ठाकूर, निलेश यादव,अतुल राठोड, अनुप अढावू, उपेंद्र आकोटकर, रोशन डाखोरे यांनी केली असून पुढोल तपास सुरू आहे.