मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद,जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आदेश

गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री दैने यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी

Fri Nov 8 , 2024
– मतदान केंद्रांचा घेतला आढावा : सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत दिल्या सूचना गडचिरोली :- ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!