कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई :- कझाकस्थान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या १२ व्या एशियन ऍक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक क्रीडापटूंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ११ कांस्य पदकांची कमाई केली.

बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोज‍ित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इंदरजित सिंह राठोड, सचिव आशिष सावंत, खेळाचे संस्थापक महेंद्र चेंबूरकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सुरेश भगत, चेअरमन नीलम बाबर देसाई व संयोजक प्रफुल मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी सुवर्ण पदक विजेत्या ऋतुजा जगदाळे, प्रिती एखंडे, सोनाली बोराडे, रितिका महावर, अक्षता ढोकले, रौप्य पदक विजेते आकाश गोसावी, आदित्य खसासे.

व कांस्य पदक विजेते अंचल गुरव, अरना पाटील, निक्षिता ख‍िल्लारे, कुणाल कोठेकर, रितेश बोराडे, नमन महावार, प्रशांत गोरे व प्रशिक्षक राहूल ससाणे तसेच योगेश पवार, निशांत करंदीकर, शुभम गिरी यांचा सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor felicitates Gymnasts winning a bounty of medals for the country

Wed Nov 2 , 2022
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated the Gymnasts from Maharashtra who brought laurels for India by winning medals at the 12th Asian Acrobatics Gymnastics Championships held at Kazakhstan at a function held at Raj Bhavan Mumbai on Tue (1 Nov). The Indian Gymnasts created history by winning 5 Gold, 4 Silver and 11 Bronze medals for India. Twenty […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com