नगरपरिषद विद्यालयमधे अटल टिंकेरिंग लॅबचे उद्घाटन

रामटेक –  रामजी महाजन देशमुख (नगरपरिषद) विद्यालय रामटेक येथे अटल टिंकेरिंग     लॅबचे उद्घाटन न.प. मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे हस्ते  12 एप्रिलला झाले. यावेळी  तहसील मुख्याध्यापक  संघाचे अध्यक्ष युवराज शंकरापुरे, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद चोपकर, लॅब इन्चार्ज संदीप दामेधर, सुरेश तुरक, गुलाबराव गजभिये, विविध्य शाळेचे  मुख्याध्यापक, शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित  होते. मुख्याधिकारी अर्चना वंजारी म्हणाल्या की प्रथम न.प. विद्यालय मध्ये केंद्र सरकारच्या निती आयोगाकडून 12 लाख रुपये मिळाले. ही गर्वाची बाब आहे , नगर परिषद शाळेमध्ये विद्यार्थी  ड्रोन, सोलडरिंग स्टेशन, टूल्स विभाग,  थ्रीडी प्रिंटर,   लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश  विभागाचे शिक्षण  प्रात्यक्षिक रुपामध्ये  घेतील . साधारणत ही शिक्षा  बारावीनंतर  व्यवसायिक कॉलेज मधे विद्यार्थ्यांना मिळते.
 प्रस्तावनामध्ये मुख्याधापक डॉ. मिलिंद चोपकर म्हणाले की निती आयोगाच्या माध्यमातून अटल टिंकेरिंग  लॅब मध्ये लॅपटॉप, थ्रीडी प्रिंटर, कंम्पुटर, ड्रोन, प्रोजेक्टर चे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. यासोबत तहसील मधल्या शाळांना याविषयी माहिती देऊ. ते म्हणाले  की आयसिटी  लॅब यामध्ये 11 कंम्पुटर आहेत. विद्यार्थ्यांना नर्सिंग  सारखे शिक्षण दिले जात आहे . कार्यक्रम यशस्वीते करिता  शिक्षक  अध्यापक  मुकेश भेंडारकर,  मंदा कुलरकर,प्रकाश उके, सुनिल पवार, विजय लांडगे,  मीनाक्षी लाकुडकर, मिना घोडमारे, स्वाती जांभुळे, स्वाती खैरकर, उन्नती एंथोनी, सुधाकर अंबागडे, सहीत आदि आदींनी प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

फिवर रॅश रूग्णांची माहिती तात्काळ दया : मनपा आरोग्य विभागाचे आवाहन  

Tue Apr 12 , 2022
व्हीपीडी सर्वेक्षणासंदर्भात डॉक्टरांचे प्रशिक्षण नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे रोग प्रतिबंधात्मक लस अर्थात व्हॅक्सिन प्रिव्हेन्टेबल डिसीज (व्हीपीडी) सर्वेक्षणासाठी मनपाचे सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासंदर्भात सोमवारी (ता.११) मनपाच्या महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.             सभेत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com