कन्हान : – महाराष्ट्र राज्या व्दारे १२ ते १४ वयोगटाती ल मुलाचे लसीकरण सुरू केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे यशवंत विद्यालय वराडा येथे ६३ शालेय विद्यार्थ्याना कोविड -१९ प्रतिबंधक लस देण्यात आली.
यशवंत विद्यालय वराडा ता पारशिवनी जि नागपु र या माध्यमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शनात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवुन शाळेतील १२ ते १४ वयोगटातील ४० विद्यार्थी व १५ ते १८ वयोगटातील २३ विद्यार्थी अश्या ६३ विद्यार्थ्याना लस देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापिका किर्ती निंबाळकर, शिक्षिका अर्चना शिंगणे, शिक्षक राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, शिक्षकेत्तर कर्मचारी मोतीराम रहाटे, दिपक पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीएचओ पायल बांते, एच ए गजेंद्र मेश्राम, एल एच व्ही प्रतिभा धोटे, एम पी डब्लु दामोध र ठोंबरे, आ. सेविका शुभांगी बुलकुंडे, छाया शेंबरे आदी चमुनी यशस्विरित्या पार पाडली.